कागल तालुक्यातील अर्जुनीचे नृसिंह मंदिर प्रादेशिक पर्यटन क्षेत्र होणार

 The Nrusinha temple of Arjuni in Kagal taluka will be a regional tourist destination
The Nrusinha temple of Arjuni in Kagal taluka will be a regional tourist destination
Updated on

सेनापती कापशी : अर्जुनी (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील नृसिंह मंदिराचा प्रादेशिक पर्यटनमध्ये समावेश झाल्याने गावचा चेहरा बदलणार आहे. पर्यटन विकासासाठी 95 लाख रुपये मंजूर असून, त्यातील 25 लाख रुपयांची कामे झाली आहेत, अशी माहिती सरपंच विद्या पेडणेकर यांनी दिली. 
त्या म्हणाल्या, ""मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवल्या. आता 75 लाख रुपये खर्चून भक्तनिवास आणि स्वागत कमान होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केलेल्या 65 लाखाच्या अंतर्गत रस्त्यामुळे गाव सुंदर बनणार आहे. ग्रामपंचायतीत मंडलिक, मुश्रीफ, घाटगे अशी युती होवून बिनविरोध निवडणूक झाली. यामुळे सर्व गट प्रमुखांनी 40 लाख रुपये देणगी जमवली. मुश्रीफ यांच्याकडून 15 लाख, धंनजय महाडिक यांचे पाच लाखाचे बक्षिस यांतून सुंदर नृसिंह मंदिर उभारले. आता ते प्रादेशिक पर्यटनक्षेत्र झाले. यासाठी संजय घाटगे यांनी अथक प्रयत्न केले. सुरेश हाळवणवर, खासदार मंडलिक, अंबरीश घाटगे, समरजितसिंह घाटगे यांचे सहकार्य मिळाले. सहाय्यक वनसंरक्षक राजन देसाई यांच्या प्रयत्नातून अर्जुनी ते गायकवाडी रस्त्याला दुतर्फा वृक्ष लागवड झाली. गीतांजली देसाई, सुनंदा देसाई, अमृत देसाई, सुनिल उन्हाळे, रंजना कांबळे, जयसिंग कांबळे, मारुती सुतार, सुनंदा सुतार, ग्रामसेवक विजय गावडे, आनंदा पोवार आदींचे सहकार्य मिळाले.''

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.