जोतिबा डोंगरावर दिड लाख भाविक घालणार नगरप्रदक्षिणा, काय आहे कारण? घ्या जाणून

Latest Kolhapur News : अनवाणी पायाने दाट धुके थंडी वारा या वातावरणात दिवसभर डोंगराभोवती प्र प्रदक्षिणा पूर्ण करतात.
जोतिबा डोंगरावर दिड लाख भाविक घालणार नगरप्रदक्षिणा, काय आहे कारण? घ्या जाणून
Updated on

Jotiba Dongar| श्री क्षेत्र जोतिबा डोंगराभोवती तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त उद्या सोमवारी ( ता. १९ ) नगरप्रदक्षिणा निघणार असून या प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातून सुमारे दीड लाख भाविक सहभागी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी सांगितले .

जोतिबा डोंगरावर दिड लाख भाविक घालणार नगरप्रदक्षिणा, काय आहे कारण? घ्या जाणून
Jotiba Dongar : जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता

यंदाच्या श्रावण षष्ठी यात्रेत भाविकांची संख्या थोडी कमी प्रमाणात होती . जे भाविक या यात्रेला आले नाहीत ते या नगरप्रदक्षिणा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत . त्यामुळे पूर्ण क्षमतेने या नगरप्रदक्षिणेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने डोंगर गर्दीने फुलून जाणार आहे.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी जोतिबा डोंगरावरील अष्ट भैरव तसेच डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगे यांचे दर्शन घेण्यासाठी ही भव्य नगर प्रदक्षिणा निघते. येणारे लाखो भाविक अनवाणी पायाने दाट धुके थंडी वारा या वातावरणात दिवसभर डोंगराभोवती प्र प्रदक्षिणा पूर्ण करतात.

या दिंडीत अगदी दोन वर्षाच्या बालकापासून ते ८० वर्षाच्या वृद्धापर्यंत भाविक या दिंडीत सहभागी होतात. ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील नियोजन केले आहे. पोलीस यंत्रणेने दिंडी मार्गावर कडक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

जोतिबा डोंगरावर दिड लाख भाविक घालणार नगरप्रदक्षिणा, काय आहे कारण? घ्या जाणून
Jyotiba Dongar : जोतिबा डोंगरावरील गायमुख तलावाला गळती; भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाझरत आहे पाणी

सोमवारी सकाळी सात वाजता जोतिबाच्या मुख्य मंदिरातून या नगरप्रदक्षणेची सुरुवात होईल त्यापूर्वी विणा पूजन होईल. दिंडीच्या अग्रस्थानी विणाधारी डवरी असतील. बाजूस भगवे झेंडे घेऊन ग्रामस्थ भाविक असतील. तसेच मंदिरात सकाळी सर्व धार्मिक विधी होऊन जोतिबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष होऊन हा नगरप्रदक्षिणा सोहळा ज्योतिबा मंदिर दक्षिण दरवाजातून बाहेर पडेल .

तो गजगतीने गायमुख तलाव या ठिकाणी येईल. त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात भाविक येतील .तेथे धार्मीक विधी होतील त्यानंतर ज्योतिबा डोंगरावर भोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंग व अष्ट तीर्थ या ठिकाणी भाविक दर्शनासाठी जातील. दिंडी मार्गावर भजन कीर्तन सोहळा होणार आहे. दरम्यान ,

या नगर प्रदक्षिणा सोहळ्याच्या तयारीचे नियोजन सुरु आहे . दिंडी मार्गावर पोलीस बंदोबस्त तसेच पाण्याचे टँकर ठेवून वैद्यकीय पथके अधिकारी अँब्युलन्स ठेवली जाणार आहे .

जोतिबा डोंगरावर दिड लाख भाविक घालणार नगरप्रदक्षिणा, काय आहे कारण? घ्या जाणून
Jyotiba Dongar : दख्खनचा राजा जोतिबा देवाचा आज जागर; सोहळ्याला दीड लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.