कोणताही घातपात नसून नैसर्गिक मृत्यू झाला आहे. टेम्पोत दुसरे कोण होते याबाबत तर्कवितर्क लावला जात होता.
कोल्हापूर : लेकीला भेटले आणि परत गावी जाताना त्यांचा नवीन वाशीनाका येथे टेम्पोतच हृदयविकाराने मृत्यू झाला. मारुती सदाशिव कुंभार (वय ६०, रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस (Rajwada Police) ठाण्यात झाली.
हृदयविकार आणि न्यूमोनिया (Pneumonia) अशा कारणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, नवीन वाशी नाका येथे टेम्पोचालक स्टेअरिंगवर पडल्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख समरजित जगदाळे यांनी काल सकाळी पाहिले. त्यांनी तातडीने ‘१००’ या पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला.
तेव्हा करवीर आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले. करवीर पोलिसांनी ही हद्द आमची नाही असे सांगितले. याचवेळी जुना राजवाडा पोलिसांनी हद्द तुमचीच असल्याचे बजावले आणि स्वतः सर्व माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्यांनी तातडीने १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेला पाचारण केले. तेथून त्यांचा मृतदेह सीपीआरमध्ये नेण्यात आला.
ही हद्द करवीर पोलिस ठाण्याची असली तरीही जुना राजवाडा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मारुती कुंभार यांची लेक सडोली खालसा येथे आहे. तिला भेटण्यासाठी काल ते कोल्हापुरात आले होते. भेटून ते पुन्हा त्यांच्या टेम्पोतून परत जात होते. रात्री उशिरा टेम्पोत बिघाड झाल्यामुळे ते नवीन वाशी नाका येथे थांबले होते.
चालकाचे नातेवाईक सीपीआरमध्ये उपचारासाठी आले असल्यामुळे तो निघून गेला. याचवेळी कुंभार हे टेम्पोतच झोपी गेले. मात्र, रात्रीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांचा टेम्पोतच मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदनानंतर पोलिसांना मिळाली.
कोणताही घातपात नसून नैसर्गिक मृत्यू झाला आहे. टेम्पोत दुसरे कोण होते याबाबत तर्कवितर्क लावला जात होता. मात्र, शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट झाले आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
- सतीशकुमार गुरव, निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.