अनुदान प्रस्तावाला महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तीस लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे.
राधानगरी : जागतिक वारसास्थळांचे कोंदण लाभलेल्या राधानगरी-दाजीपूर अभयारण्याची (Radhanagari-Dajipur Sanctuary) ख्याती दूरवर आहे. मात्र, पर्यटकांसाठी (Tourists) आवश्यक सोयीसुविधांच्या कमतरतेने अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोजकीच होती. आता पाच वर्षांत होम स्टे सुविधेमुळे पर्यटकांचा ओढा वर्षागणिक वाढत आहे.
पर्यटन व्यवसायाला (Tourism Business) आर्थिक बळ आणि स्थानिकांना रोजगार निर्मितीला होम स्टे सुविधा पोषकच ठरली आहे. पुढील पाच वर्षांत शंभर होम स्टेचे (Home Stay) उद्दिष्ट आहे. अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांच्या निवास व भोजन सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी होम स्टे संकल्पनेला कृतीचे बळ मिळाले आहे. पाच वर्षांत राधानगरीपासून दाजीपूरपर्यंत अभयारण्य क्षेत्रातील गावात पंचवीसहून अधिक खासगी होम स्टेची उभारणी झाली आहे.
ऊर्जा व सोयीसुविधांनुसार होम स्टे निवासासाठी भाडे आकारणी होते. भोजन व्यवस्थाही आहे. पर्यटन हंगामातच नव्हे, तर वर्षभर कधीही राधानगरी दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुविधांयुक्त खात्रीची सुरक्षित निवास भोजन व्यवस्था होम स्टेने निर्माण झाली आहे. या व्यवस्थेतून रोजगाराचे नवे साधन उभे राहिले आहे. सध्या येथे वनजीव विभागाच्या तंबू निवासाची सुविधा पर्यटकांसाठी आहे. याचे सर्व हक्क स्थानिक परिस्थिती की विकास समितीकडे असल्याने यातूनही स्थानिकांना रोजगार मिळत आहे.
अभयारण्य क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती उद्देशाने खासगी जमिनीवर होम स्टे बांधणीसाठीही स्थानिकांना प्रवृत्त करण्यासाठीही अनुदानाचा प्रस्तावित अभयारण्यात पर्यटन निवास आराखड्यात समावेश आहे. पुढील पाच वर्षांत १०० होम स्टे उभारणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. होम स्टेसाठी तीन लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.
अनुदान प्रस्तावाला महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तीस लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. अनुदान तत्त्वाने आगामी काळात जंगल सफारीसाठी आणखी वाहनांची उपलब्धता होणार आहे. होम स्टेच्या संख्येत भर पडून पर्यटकांना सोयीसुविधांचा अभाव राहणार नाही.
अनुदानामुळे वाहन खरेदी आणि होम स्टे उभारणीचा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसणार आहे. स्थानिकांचा सहभाग आणि परिस्थिती की विकास समितीमार्फत पर्यटन व्यवस्थापनाची ही नांदीच ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.