Kolhapur : तुळजाभवानी मंदिर परिसरात दारू पिऊन दगडावर पडल्याने भिक्षुक ठार; खुनाचा संशय बळावला

रात्री नारायणचा तेथीलच एका व्यक्तीशी पैशाच्या कारणावरून वाद झाला होता.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on
Summary

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात भिक्षा मागून खातात. काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास नारायण दारू पिऊन होता.

कोल्हापूर : भवानी मंडप (Bhavani Mandap Kolhapur) येथील तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) परिसरात दारू पिऊन दगडावर पडल्यामुळे भिक्षुकाचा मृत्यू झाला. नारायण शिवाजी कसबे (वय ३०. रा. मूळ जामगाव ता. बार्शी, जि. उस्मानाबद. सध्या रा. अंबाबाई मंदिर परिसर) असे त्याचे नाव आहे.

याची फिर्याद वडील शिवाजी निवृत्त कसबे यांनी दिल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी (Rajwada Police) सांगितले. दरम्यान, खून झाल्याच्या संशयामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांनी सांगितले, की आई-वडील आणि मुलगा हे भिक्षुक आहेत. गेली वीस-पंचवीस वर्षे ते तुळजाभवानी मंदिराजवळ राहतात.

Kolhapur Crime News
Satara : दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री कोयता-तलवारी नाचवणाऱ्यांचा बंदोबस्‍त करणार का? उदयनराजेंचा संतप्त सवाल

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात भिक्षा मागून खातात. काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास नारायण दारू पिऊन होता. तुळजाभवानी मंदिराजवळील पाण्‍याच्या टाकीजवळ त्याचा तोल जावून तो पडला. त्याच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्याला पहाटे उठविताना त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, रात्री नारायणचा तेथीलच एका व्यक्तीशी पैशाच्या कारणावरून वाद झाला होता.

Kolhapur Crime News
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'हा' किल्ला 16 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

त्यामुळे हा खून झाला आहे काय? असा संशय बळावला. पोलिसांची धावपळ उडाली. मात्र पडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे पोलिस आणि नातेवाईकांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला. वडिलांनीही मुलगा दारूच्या आहारी गेला होता. तो काल दारू पिऊन आला होता, त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्‍याचेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तशी फिर्याद नोंद करून घेतली.

Kolhapur Crime News
Karnataka : पाठ्यपुस्तकांतून सावरकर, हेडगेवारांचे धडे वगळले; पुस्तकात फुले, आंबेडकरांचा केला समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.