Kolhapur Crime : नरसिंह मंदिर अचानक विहिरीत कोसळून शेतकरी बुडाला; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर..

Kolhapur Crime : कृष्णात दांगट हे शेतकरी (Farmer) असून, त्यांच्या शेतातील विहिरीशेजारी कुलदैवत नरसिंह मंदिर आहे.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

कृष्णात दांगट यांना दोन मुले, एक विवाहित मुलगी, सून आणि नातू असा परिवार आहे. मुले शेतीबरोबरच कंत्राटी कामगार म्हणून काम करतात.

उजळाईवाडी : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दांगट मळ्यातील नरसिंह मंदिर (Narasimha Temple) काल सकाळी अचानक विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकजण बुडाला. कृष्णात उमराव दांगट (बटू अण्णा) (वय ६४) असे त्यांचे नाव आहे. जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांकडून रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधमोहीम सुरू होती. परंतु, त्याला यश आले नाही. दुर्घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.