सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. निवडणूक शांततेत व्हावी, म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे.
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडाने आज निवडणूक आचारसंहिता सुरू असतानाच डोक्यात दगड घालून एकाचा खून केला. सतीश महादेव पाटील (वय ४८, रेल्वेस्थानक परिसर, कोरगांवकर कंपाऊंडशेजारी, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. खून केल्याप्रकरणी हद्दपार गुंड सौरभ दीपक जाधव (वय २२, रा. कनाननगर) आणि रोहन ऊर्फ चिक्या विजय गायकवाड (वय २४, रा. एपी स्कूल कंपाऊंड, कनानननगर) या रेकॉर्डवरील दोघांना पोलिसांनी (Shahupuri Police) अटक केली.