हुपरी : पत्नीच्या (Wife) खून प्रकरणात (Murder Case) जन्मठेप भोगून आलेल्या एकाने त्याच्या वडिलांचा किरकोळ कारणातून निर्घृण खून केला. हा प्रकार येथील गंगानगरमध्ये गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडला. या प्रकरणी हुपरी पोलिसांनी (Hupari Police) संशयित अनिल अप्पासाहेब नुल्ले-चिखले (वय ४५, रा. नदीवेस, गंगानगर हुपरी) याला अटक केली आहे. अनिलने लोखंडी पाईप आणि दांडक्याने डोक्यात प्रहार केल्याने वडील अप्पासाहेब कृष्णा नुल्ले-चिखले (७२) यांचा मृत्यू झाला.