Onion
Onionesakal

Onion Rate : कांद्याच्या दरात १० ते १५ रुपयांनी झाली वाढ; दराचा आणखी भडका उडण्याची शक्यता

कांद्याचे दर वाढतच असून या आठवड्यात किलोला आणखी १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.
Published on

इचलकरंजी - कांद्याचे दर वाढतच असून या आठवड्यात किलोला आणखी १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची प्रतीक्षा लांबल्यास दराचा आणखी भडका उडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

इतर भाजीपाल्याची मागणी थंडावल्याचे चित्र आहे. मेथीची आवक कमीच असून पालेभाज्यांचे दर आणि आवक जैसे थे आहेत. हंगामी देशी गाजराची आवक सुरू झाली असून हिरव्या वाटाण्याच्या शेंगाची प्रतीक्षा आहे.

सर्वत्र शिवारात भुईमुगाच्या काढणीला वेग आल्याने ठिकठिकाणी ओल्या भुईमुगाच्या शेंगा विक्रीस आहेत. हा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ओल्या शेंगाना मागणी वाढली आहे. आवक जशी वाढेल तसे दरही कमी होत आहेत. लिंबूचे भाव वर खाली होत आहेत.

या दिवसात लिंबूना मागणी वाढत असल्यामुळे दर हळूहळू वाढत जातील, असे विक्रेत्यांनी सांगितले. फुलबाजारात फुलांचे भाव कवडीमोल झाले आहे. कायम तेजीत असणाऱ्या निशिगंधाचे दरही कोमजले आहे. त्यामुळे दिवाळीलाच फुलांना भाव येणार आहे.

Onion
Pune Crime : सैन्यदलातील जवानाकडून वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला

फळबाजारात फळांचे दर काहीसे भडकत आहेत. पपई, डाळिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत. टरबूजाची नवीन आवक सुरू झाली आहे. दसरा संपल्याने धान्य व खाद्यतेल बाजाराला दिवाळी सणाची चाहूल लागली आहे. मात्र मागणी फारच कमी आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर महागाईची झळ ग्राहकांना सोसावी लागणार नाही, अशी स्थिती होईल.

प्रति किलो रुपये भाजीपाला - टोमॅटो- १० ते १५ , दोडका-३० ते ४०, वांगी - ५० ते ६०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ३० ते ४०, मिरची -३० ते ४०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - ६० ते ७०, लसूण- १८० ते २००, आले- १८० ते २००, लिंबू- २०० ते ५५० शेकडा, गाजर -५० ते ६०, बीन्स- ४० ते ५०, वरणा शेंगा - ५० ते ६०, भेंडी- ३० ते ४०, काकडी- ४० ते ५०, गवार- ५० ते ८०, दुधी - २० ते ३०, कोथिंबीर -१५ ते २०, मेथी - २५ ते ३०, अन्य पालेभाज्या - १५ ते २० रुपये, शेवगा -५ ते ८ रुपये नग.

फुले : झेंडू - १० ते २०, निशिगंध - ५० ते ६०, गुलाब - १५०, गलांडा - ३० ते ४०, शेवंती - ३० ते ४०, आष्टर - १०० ते १२०.

फळे : देशी सफरचंद - १२० ते २००, विदेशी सफरचंद - ३०० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- ५० ते ८०, डाळिंब- १२० ते ३००, चिकू- ६० ते ८०, पेरु- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- १०० ते ११०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ८० ते ९० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, ड्रॅगन - २०० ते ३००.

खाद्यतेल : सरकी - १०० ते १०५, शेंगतेल - १६६ ते १७२, सोयाबीन - १०५ ते ११०, पामतेल - ९८ ते ११०, सूर्यफूल - १०२ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३८ ते ५८, बार्शी शाळू- ४५ ते ६२, गहू- ३२ ते ४०, हरभराडाळ - ७५ ते ७९, तुरडाळ- १६० ते १७०, मुगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ- ११० ते १२०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १२५ ते १३०, मसुर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोला -१५० ते १६०.

कांदा ३० टक्क्यांनी घटला

बाजारात समितीत दैनदिन कांद्याच्या सुमारे ५०० पोत्यांची आवक होते. मात्र सध्या आवक ३० टक्क्यांनी घटली असून सुमारे ३५० पोत्यांवर आली आहे. आज घाऊकला किलोला ५० ते ५५ रुपये दर होता. बाजारात किरकोळ विक्री ६० ते ७० रुपये किलोने होत होती. पुढील काही दिवस बाजार समितीत आवक आणखी कमी येईल, असे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()