ऑनलाईन सातबारा अन् हेलपाटे

ऑनलाईन सातबारा अन् हेलपाटे
Updated on

कोल्हापूर : शेतकऱ्यांना तत्काळ आणि वेळेत सातबारा मिळावा, यासाठी राज्यातील सर्व खातेदारांचा सातबारा ऑनलाईन करण्यात आला. आता हाच सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कधी तलाठ्यांच्या सहीची तर कधी ऑनलाईन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागत आहे. सातबारा आहे तर सही नसते. सहीसाठी तलाठी असतात तर सातबाराची प्रिंट काढण्यासाठी कार्यालयात माणूस नसतो. यामुळे सातबारा हायटेक केला; पण खातेदारांची पायपीठ काय अजून थांबली नसल्याची परिस्थिती आहे.(online-satbara-fraud-case-in-kolhapur-news)

राज्यातील शेतकऱ्यांना कोठूनही सातबारा मिळावा यासाठी चांगल्या उद्देशाने सातबारा ऑनलाईन केला. पूर्वीप्रमाणे त्यावर काहीही लिहावे लागत नाही. त्यावर पीक पाहणी लिहावी लागत नाही. कुळांची नोंद करावी लागत नाही, तर एक क्‍लिक करुन प्रिंट काढल्यानंतर ही सर्व माहिती मिळते; पण हा सातबारा अजूनही कायदेशीर वापरा करता ग्राह्य मानला जात नाही. यासाठी प्रिंट किंवा ऑनलाईन घेतलेल्या सातबारावर तलाठ्यांची सही बंधनकारक आहे.

मात्र, तलाठी कार्यालयातून हा सातबारा घेतल्यानंतर त्यावर सहीसाठी तलाठ्यांची वाट पाहवी लागते. ते कधी येतात किंवा जातात याची माहिती तलाठी कार्यालयातील कोतवाल किंवा इतर कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे तलाठ्यांना फोन केला तर त्यांचा फोन बंद असतो. वारंवार त्याची माहिती घेण्यासाठी खातेदारांना आणि शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे ज्या उदेशाने सातबारा ऑनलाईन झाला त्याचा त्रास अजूनही संपला म्हणता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तलाठ्यांनी वेळेत कार्यालयात येणे किंवा लोकांना साताबारा देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

तलाठी कार्यालयात वारंवार मागणी करुनही सातबारा वेळेत मिळत नाही. ऑनलाईन सातबारावर तलाठ्यांची सही आवश्‍यक आहे; पण तलाठ्यांची अनेक वेळा वाट पहावी लागते. त्यामुळे खातेदारांना तत्काळ सातबारा मिळेल यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या पाहिजेत.

- प्रदिप पाटील, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.