पोलिसांचा फौजफाटा एकीकडे आणि दुसरीकडे क्षीरसागर समर्थक जमले. दानवेंचा ताफा थेट शनिवार पेठेत आला.
कोल्हापूर : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल शनिवार पेठेतील राजेंद्र वरपे कुटुंबीयांची भेट घेतली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांना विरोध केल्याने तणाव वाढला. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे शेजारी असलेल्या वरपेंना काही महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. त्याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे वरपे कुटुंबीयांची दानवे (Ambadas Danve) यांनी घरी जाऊन भेट घेतली.
येथे कार्यकर्त्यांनी दानवेंना अडविण्याचा प्रयत्न करताना पोलिस बळाचा वापर करून त्यांना रोखले. त्यामुळे अनर्थ टळला. पोलिसांचा फौजफाटा एकीकडे आणि दुसरीकडे क्षीरसागर समर्थक जमले. दानवेंचा ताफा थेट शनिवार पेठेत आला. उपनेते संजय पवार, विजय देवणेही होते. मात्र पोलिसांनी दानवे यांना सोडले जाईल, असे सांगितले. त्यामुळे पवार, देवणे लांब थांबले. दानवे यांच्यासोबत संपर्क नेते अरुण दुधवडकर वरपे यांच्या फ्लॅटवर पोचले.
शहरप्रमुख रणजित जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव हे तळघरातून मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेऊन दानवे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी निरीक्षक अजय सिंदकर, संजीवकुमार झाडे यांच्यासह डी. बी. शाखेच्या पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलिसांशी झटापट झाली. येथे क्षीरसागर यांचे चिरंजिव ऋतुराज यांनी कार्यकर्त्यांना आवर घातला. त्यांना भेटू द्या, असाही सल्ला दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. थोड्याचवेळात दानवे यांनी वरपे कुटुंबीयांची भेट घेऊन निघून गेले. सुमारे तासाभरानंतर तेथील तणाव निवळला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, भीतीचे कारण नाही, असे दानवे यांनी कुटुंबीयांच्या (Rajendra Varpe Case) भेटीत दिले.
पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, ‘मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पुढील दौऱ्यात पोचेपर्यंत मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होईल. ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावर गुन्हे दाखल असले म्हणून काय झाले? माझ्यावरही ७० गुन्हे दाखल आहेत, ही बाब फार मोठी नाही. मी सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते गुन्हा दाखल करतील.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.