कोल्हापूर : बदलत्या वातावरणाला सामोरे जात कारभारवाडी (ता. करवीर) येथील शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्थेच्या ४०० शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे १०२ एकर शेती सुजलाम्-सुफलाम् केली आहे. ठिबकच्या पाण्याने शेती फुलवत ५० टक्के शेतकऱ्यांची आता आरोग्यदायी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू आहे.
कोल्हापूरपासून १७ किलोमीटरवर असलेले कारभारवाडी हे जेमतेम ४५० लोकवस्तीचे गाव. सडोली खालसा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील छोटीशी ही वाडीच. ६० कुटुंबांचे वास्तव्य या वाडीत असून, शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्थेच्या पुढाकाराने गावातील संपूर्ण शेती ठिबक योजना आकाराला आली. ती संगगणकीकृत आहे. गावच्या विकासाच्या आड येणारे राजकारणातील गट-तट बाजूला ठेवून या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीची प्रचीती आणून दिली आहे.
गावातील ६० कुटुंबांची मिळून १३० एकर जमीन आहे. यापैकी एकशे दोन एकर जमीन एकाचवेळी ठिबकखाली आणून पाणी बचतीबरोबरच शेतीची सुपीकता वाढवण्याचा संदेशही गावकऱ्यांनी दिला आहे. शाश्वत शेती, जमिनीची सुपीकता त्यातून पाण्याची बचत करणे ही आव्हाने सध्या शेतीसमोर आहेत. भावी पिढीला जमिनीची प्रत चांगली व कसदार देण्याची जबाबदारी आताच्या पिढीवर आहे. त्याशिवाय यापुढे पाणी बचतीशिवाय पर्याय नाही, या जाणीवेतून गावाने हा पुढाकार
घेतला आहे.
कारभारवाडी नाव
सध्या कारभारवाडीत राहणारी कुटुंबे एकाच भावकीतील आहेत. पूर्वी ही सर्व भावकी सडोलीत एका वाड्यातच राहत होती. हा वाडा त्या वेळी कारभाऱ्याचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता. घरापासून शेती लांब पडत असल्याने या वाड्यातील लोक कारभारवाडीत राहू लागल्याने या वस्तीला कारभारवाडी असे नाव पडले.
दृष्टिक्षेपात
"पाण्याच्या बचतीबरोबर जमिनीची सुपीकता कायम ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याने जमिनी खराब होऊ नयेत. ठिबकमुळे ३५ वरून ५० टनापर्यंत वाढ झाल्याने पाच वर्षांत हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. पुढचा टप्पा म्हणून आता आम्ही सेंद्रिय शेतीकडे
वळलो आहे."
- नेताजी पाटील, अध्यक्ष, शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्था
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.