चिक्कोडी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघातांत लोकांचे जीव जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे हेल्मेट नसल्याने होत आहेत. त्यासाठी हेल्मेट सक्तीने वापरावे. त्यामुळे आपले प्राण वाचतील.
तसेच अमली पदार्थांचे सेवन होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस खाते प्रयत्न करत आहे. यासाठी सर्वजण सहाकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी केले.
चिक्कोडी येथे हेल्मेट जागृती व अमली पदार्थ विरोधी जागृती कार्यक्रमासाठी आयोजित दुचाकी रॅलीचे उद्घाटन करून ते बोलत होते. जिल्हाधिकारी नितीश पाटील यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून दुचाकी रॅली शहरातून काढली.
डॉ. गुळेद म्हणाले, जिल्हा पोलिस खात्याने आता आणखी कडक कारवाई कऱण्यास सज्ज आहे. त्यासाठी सर्वांनी दंडासाठी नव्हे, तर जीवासाठी हेल्मेट वापरावे. कोणत्याही गैरप्रकारांना थारा देऊ नये.
अपघातांची आकडेवारी पाहिल्यास मृत्युमुखी पडलेल्यांत सर्वाधिक हेल्मेट नसल्याने मृतांची संख्या वाढली आहे. शहर असो वा महामार्ग सर्वांनी हेल्मेट वापरावे. याशिवया जिल्ह्यात कुठेही अमली पदार्थांची तस्करी, विक्री, अथवा वापर आढळल्यास पोलिस
कारवाई करतील. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, पोलिस खाते व सर्व विभागांनी अशा उपक्रमाला हातभार लावला आहे. चिक्कोडीत दुचाकीस्वारांचे हेल्मेटशिवाय वावरणे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता पोलिस खाते कारवाई सुरू करेल. दुचाकीस्वारांनीही यासाठी हेल्मेट सक्तीने वापरावे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयापासून बसव सर्कल, निपाणी रोड, बसस्थानक, के. सी. रोड येथून रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिस प्रांताधिकारी एस. एस. संपगावी, पोलिस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुला, आरटीओ जी. पी. विशाल, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी
डॉ. एस. एस. गडेद, तालुका आरोग्याधिकारी सुकुमार भागाई, गटशिक्षणाधिकारी बी. ए. मेकनमर्डी यांच्यासह शिक्षण खात्यातील अधिकारी, शिक्षक, विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.