कोल्हापूर: कर्नाटकच्या बेल्लारी (Bellary of Karnataka) मधून महाराष्ट्रमध्ये पुरवठा करण्यात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा (Supply of oxygen) रोखण्यात आला आहे. तो पुन्हा सुरू करावा. अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil)यांनी मागणी केली आहे.
Oxygen supply from Karnataka to Maharashtra demand for satej patil kolhapur marathi news
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापुरातून गोव्याला जाणारा दहा मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा हा बेल्लारीतून करावा असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.
पु़ढे ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवशी 300 ऍक्टिव्ह रुग्ण सापडतील हे गृहीत धरून बेडची व्यवस्था केली आहे. याचा प्लॅन सुद्धा तयार असून रुग्ण संख्येत वाढ होईल तसतशी केअर सेंटर सुरू केली जातील.जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीविषयी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जवळपास 12 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. बेड आणि इतर आरोग्य सुविधा जिल्हा प्रशासनाच्या हातात असल्या तरी ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर चा पुरवठा केंद्राच्या यंत्रणेतून होतो. त्यामुळे लोकांनी देखील काळजी घ्यावी आणि जनता कर्फ्यू ला प्रतिसाद द्यावा असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
Oxygen supply from Karnataka to Maharashtra demand for satej patil kolhapur marathi news
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.