Kolhapur Rain Update : पंचगंगा धोका पातळीकडे; कोल्हापूर जिल्ह्याच्‍या सर्व भागांत संततधार; वाहतूक ठप्प

Kolhapur latest news in marathi | जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८.४ मिमी पाऊस पडला आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ५८.४ मिमी पाऊस पडला. ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain UpdateSakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वभागात पावसाची संततधार तिसऱ्या दिवशीही सुरू होती. शहरासह सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. धरणक्षेत्रातही पावसाची दमदार बरसात झाल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. रात्री १२ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फूट ४ इंच झाली असून, सकाळपर्यंत नदी इशारा पातळी ओलांडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८.४ मिमी पाऊस पडला आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ५८.४ मिमी पाऊस पडला. ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पुलावर पाणी आल्याने कळे-गगनबावडा, रत्नागिरी-कोल्हापूर ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. शहरातील संभाव्य पूरप्रवण भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहाणी केली.

तावडे हॉटेल परिसरातील ८० लोकांना शाहू सांस्कृतिक भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे; तर सुतारवाडा परिसरातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. राधानगरी धरणातून १४०० क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात येत आहे.

तालुका निहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

हातकणंगले - १५.६, शिरोळ - ७.१, पन्हाळा - २९.१, शाहूवाडी - ५८.४, राधानगरी - २९.४, गगनबावडा - ३५.६, करवीर - २१.८, कागल - २४.७, गडहिंग्लज - २५.६, भुदरगड - ४१.४ मिमी, आजरा - ४२.२, चंदगड - ३६.२ असा एकूण २८.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • तुळशी - २.३३

  • वारणा - २४.५७

  • दूधगंगा - १४.७०

  • कासारी - १.९६

  • कडवी - २.३३

  • कुंभी - १.७०

  • पाटगाव - ३.२

  • चिकोत्रा - ०.८२

  • चित्री - १.६६

  • जंगमहट्टी - १.२२

  • घटप्रभा - १.५६

  • जांबरे - ०.८२

  • आंबेआहोळ - १.२३

  • सर्फनाला - ०.४८

  • कोदे - ०.२१

पाण्याखाली गेलेले बंधारे

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी, म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे,

चिखली व करडवाडी, साळगांव, विलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी व हरळी, दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी, भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे, चिंचोली, तांदुळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व शिरगाव, कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे,

यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-१ व नवलाचीवाडी-२, तर धामणी नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे, हिंडगाव, कानडे-सावर्डे, अडकूर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी, बीड असे एकूण ७९ बंधारे पाण्याखाली आहेत.

दिवसभरात...

- राधानगरी धरणी ८० टक्के भरले

- शहरात १० ठिकाणी झाडे पडली

- कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर मलकापूर येथील जाधवाडी येथे पाणी

- कळे ते गगनबावडा मार्ग बंद

- निलेवाडी-ऐतवडे मार्ग बंद

- वैतवडे-साळवण वाहतूक थांबली

- बीड-महे पुलावर पाणी

- शिरढोण-कुरुंदवाड पुलावर पाणी

- रुकडी-माणगाव रस्त्यावर पाणी

- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

- चंदगढमधील ७ लघु प्रकल्प भरले

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरप्रवण भागाची पाहणी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज संध्याकाळी शहरातील संभाव्य पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यामध्ये ते तावडे हॉटेल भागात पहिल्यांदा गेले. यावेळी त्यांनी तेथील फेरीवाले कुटुंबियांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच स्थालांतरित केल्या जाणाऱ्या शाहू सांस्कृतिक भवनाची पाहणी केली. सुतारवाड्यातील घरांचीही पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ हे होते.

पुराचा अंदाज घेऊन शाळा भरवा

जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीची सर्व साधने बंद होत आहेत. त्यामुळे सर्व माध्यमे आणि व्यवस्थापनांच्या शाळा पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन भरवाव्यात. नादुरुस्त आणि धोकादायक इमारतीमध्ये शाळा भरवण्यात येऊ नयेत, अशी सूचना प्राथमिक शिक्षण अधिकारी मिना शेंडकर यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()