कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार; पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार; पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर (kolhapur Rain)जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधारा(Rajaram dam) पाण्याखाली गेला आहे. तर आज सकाळी सात पर्यंत पंचगंगा नदीची (panchganga river)पाणीपातळी 24 फूट 5 इंच वाढली आहे. हीच पाणी पातळी काल (बुधवार)सकाळी 7 ला 13 फूट 9 इंचा पर्यंत होती. चोवीस तासात तब्बल 11 फूट पाणी पातळी वाढली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर चंद्रे फाटा-शेळेवाडी मध्यभागी असलेला पर्याय रस्ता पाण्याने वाहुन गेला आहे.तरी कोल्हापुरकडे जाणाऱ्या लोकांनी निढोरी मार्गे जावे लागणार आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील शुक्रवार पेठ व ग्रामीण भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. रात्रभर मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच राहिली. त्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात, सोयाबीन व भुईमूग पेरणी ला गती आली आहे. आज पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.

पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान ओढ्यातून किंवा पाण्याखाली गेलेल्या बंधार्‍यावरून धोकादायक रितीने वाहतूक करू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.