कुणालाही मदतीपासून वंचित ठेवू नका; सतेज पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश

नदीकाठाचे लाईट शिफ्टिंग आणि मोबाईल टॉवर प्रकल्प हाती घेतले जातील.
कुणालाही मदतीपासून वंचित ठेवू नका; सतेज पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
Updated on

पन्हाळा : पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यात (panhala fort) अतिवृष्टी आणि महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यातील डोंगरांचे ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करून त्याचे मार्किंग करा. अतिवृष्टीमुळे आणि दरडी घसरल्याने (landslide) नुकसान झालेल्या कुटुंबाचे वर्गीकरण करून सर्वांना मदत द्या, कुणालाही मदतीपासून वंचित ठेवू नका असा आदेश पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला. आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

दोन्ही तालुक्यातील नदीकाठच्या काही गावात पुरामुळे वीजेचे खांब पडल्याने आठ दिवस वीज नव्हती. मोबाईलला रेंज नाही अशी अडचणींना तोंड द्यावे लागले, ही बाब आमदार विनय कोरे (vinay kore) यांनी निदर्शनास आणून दिले. नदीकाठाचे लाईट शिफ्टिंग आणि मोबाईल टॉवर प्रकल्प हाती घेतले जातील. या गावांना अगोदरच रॉकेल व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मे महिन्यात करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. भविष्यात आपत्तीची शक्यता गृहीत धरून प्रत्येक विभागाने एसपीओ (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार ठेवावा अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.

कुणालाही मदतीपासून वंचित ठेवू नका; सतेज पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
नेत्यांनो, यायचे असल्यास हाती झाडू घेऊन या नाहीतर....

जिल्ह्यात डोंगर माथ्यावर सपाटीकरण करून फार्महाऊस मोठ्या प्रमाणात बांधले जात आहेत. अशा सपाटीकरणास किंवा बांधकामास प्रांतानी मंजुरी देवू नये. पूर, अतिवृष्टी आणि दरडी कोसळणे त्वरित पंचनामे करून आपदग्रस्ताना तात्काळ मदत देण्याची सूचना त्यांनी केली. पूरबाधित तसेच भूस्खलनाने बाधित होणाऱ्या लोकांचे येत्या तीन वर्षांत पुनर्वसन करायाचे आहे, त्यासाठी लाभार्थ्यांना रमाई, पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजनेचा लाभ देण्यासाठी यादी तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तुम्ही महापुरात चांगले काम केले आहे. आता शासकीय मदत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करा. मदत करताना तुम्ही अडचणीत येणार नाही याची जबाबदारी माझी अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विश्वास दिला.

यावेळी गोकूळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, जिल्हा बँक संचालक सर्जेराव पाटील पैरिडकर, पन्हाळा सभापती वैशाली पाटील, नगराध्यक्षा सौ रुपाली धडेल. मलकापूर नगराध्यक्ष अमोल केसरकर, पन्हाळा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष जयसिंग हिर्डेकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, कृषि अधिकारी रामचंद्र धायगुडे, सार्वजनिक बांधकाम चे संजय काटकर,आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.