पायी चालणाऱ्यांसाठी पन्हाळगड खुला; वाहतूकीसाठी प्रयत्न सुरु

तटाकडील बाजूला बॅरिकेड्स लावून पायी ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला.
पायी चालणाऱ्यांसाठी पन्हाळगड खुला; वाहतूकीसाठी प्रयत्न सुरु
Updated on

पन्हाळा : मागील शुक्रवारी पन्हाळा गडावरील चार दरवाजा येथील घसरलेला मुख्य रस्ता आज अखेर किमान चालत ये-जा करण्यासाठी खुला झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काम केल्याने लोकांची गैरसोय टळली आहे. आता खचलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रिलिंग करून खालील बाजूस किती अंतरावर दगड लागतो, याचा अंदाज घेत तेवढाच पूल तयार करून वाहतूक चालू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पायी चालणाऱ्यांसाठी पन्हाळगड खुला; वाहतूकीसाठी प्रयत्न सुरु
पोलिसांचे ट्विट, महापूर नियंत्रणात हिट; व्यवस्थेवरील ताण झाला कमी

गडावरचा जुन्या प्रवासी कर नाक्याजवळ अतिवृष्टीमुळे चार दरवाजा तटबंदी परिसरातील भराव खचून वाहतुकीचा मार्ग बंद झाला होता. दररोज ढासळणाऱ्या दगड मातीमुळे चालत ये-जा करण्यास मनाई करण्यात आली होती. आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांशी बोलून रस्त्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता संजय काटकर, उप अभियंता सी. ए. आयर्रेकर आणि कनिष्ठ अभियंता अमोल कोळी यांनी पाहणी करून आज तातडीने खचलेल्या भागात बॅरिकेड्स लावून धोक्याचा भाग बंद केला. तटाकडील बाजूला बॅरिकेड्स लावून पायी ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला.

पायी चालणाऱ्यांसाठी पन्हाळगड खुला; वाहतूकीसाठी प्रयत्न सुरु
मदत राहुदे, फक्त लढ म्हणा; बदनामी न करण्याचं चिखलीकरांचं आवाहन

यामुळे काही दिवस बुधवारपेठे पर्यंतच वाहतूक सुरू राहणार आहे. भराव खचलेल्या भागात तळाशी दगडी शिळा असल्याने रस्त्यावर बोअर मशिनद्वारे ड्रिलिंग करून ३० ते ३५ फुटांवर खडक लागल्यास पूल उभा करून तात्पुरती वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खडक लागल्यास अवघ्या महिना-दीड महिन्यात पूल तयार होणार आहे. पर्यायी वाहतूक मार्गासाठी काटकर, आयरेकर, परिक्षेत्र वनाधिकारी अविनाश तायनाक, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रविंद्र धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी रेडेघाट मार्गाची पाहणी केली. हाही दुचाकी आणि हलक्या चारचाकी गाड्यांसाठी तात्पुरता रस्ता होण्याची शक्यता आहे. तात्पुरती व्यवस्था झाल्यानंतरच खचलेल्या खालच्या बाजूने कायमस्वरूपी रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.