पानसरे खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात व्हावी, ATS ची कोर्टात माहिती

महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव : एटीएसची न्यायालयात माहिती
kolhapur district Court pansare murder case
kolhapur district Court pansare murder case
Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा खटला कोल्हापुरातीलच न्यायालयात चालावा, याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिला आहे, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक तुषार दोशी यांनी आज विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यामार्फ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. यावेळी एस आय टी चे प्रमुख व अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे हे सुद्धा न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यानच्या, काळात महाराष्ट्र शासनाकडून हा खटला कोठे चालवावा याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

kolhapur district Court pansare murder case
Travel : आश्चर्यचकित करणारी भारतातील गावं; एकदा पहायलाच हवीत!

पानसरे खटल्यातील साक्षीदार, पंच हे कोल्हापूर आणि परिसरातील आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथक सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रामध्येच कोल्हापूर जिल्हा आहे. खटल्यातील साक्षीदार, पंच, संशयित आरोपी यांना सोलापूर न्यायालयात ये-जा करणे जोखमीचे होणार आहे. त्यामुळे हा खटला कोल्हापूर जिल्ह्यातीलच न्यायालयात चालवावा, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाकडून महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पानसरे खून खटल्यातील संशयित पहिला आरोपी समीर गायकवाड हा सुद्धा आज न्यायालयात हजर होता. तपास (एटीएस) दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे देण्यात आला असल्याने (एसआयटी) विशेष तपास पथक यांच्याकडे हजेरी द्यावी की नाही मुद्दा संशयित आरोपींच्या वकील प्रीती पाटील यांनी उपस्थित केला. यावर ऍड. राणे यांनी एटीएस अधिकाऱ्यांची चर्चा करून पुढील सुनावणीपर्यंत गायकवाड याने कोल्हापुरात एसआयटी मध्येच प्रत्येक रविवारी हजेरी द्यावी अशी विनंती केली. यावर न्यायाधीश तांबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत कोल्हापुरातच हजेरी द्यावी असे आदेश दिले.

kolhapur district Court pansare murder case
Sherpas of Kashmir; ड्रग्सविरोधात जागरूकता करण्यासाठी स्काय मॅराथनचे आयोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.