Pansare Murder Case: मोठी घडामोड! डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक! कॉ. पानसरे खूनप्रकरणी कोर्टाकडून जामीन रद्द

Pansare Murder Case: कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंचा आज युक्तीवाद पार पडला.
Comrade Govind Pansare
Comrade Govind Pansareesakal
Updated on

कोल्हापूर : काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयानं रद्द केला आहे. तसंच तावडेला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दहशतवादविरोधी पथकाला (ATS) दिले आहेत. न्या. एस. एस. तांबे यांनी हे आदेश दिले. यानंतर तावडेला अटक झाल्याचंही सुत्रांकडून कळतं आहे.

Comrade Govind Pansare
NCP Supreme Court: राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळाचं काय होणार? अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टानं मागितलं उत्तर

पानसरे खून खटल्यात डॉ. वीरेंद्र तावडेला सन २०१३ मध्ये जामीन झाला होता. पण नुकतीच डॉ. दाभोलकर खून खटल्यात त्याची निर्दोष सुटका झाली होती. यानंतर सरकारनं त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं यावर निर्णय घेण्यासाठी ही याचिका पुन्हा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग केली होती.

यावर आज कोर्टात दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाला. यावेळी आरोपींकडून वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. तर पानसरे कुटुंबियांकडून विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि अॅड. शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.

Comrade Govind Pansare
India Post Recruitment: पोस्ट खात्यात 44,228 पदांसाठी 'मेगा भरती'; 5 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

या सुनावणीनंतर न्या. एस. एस. तांबे यांनी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द करुन त्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश एटीएसला दिले. त्यानुसार, एटीएसनं तावडेला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.