Gas Cylinder Explosion : गळतीमुळं गॅस सिलिंडरचा भडका; आई-वडिलांसह दोन्ही मुलं आगीत भाजून जखमी

पतीला चहा करून देण्यासाठी लक्ष्मी या देखील उठल्या होत्या.
Cylinder Gas Explosion Belgaum
Cylinder Gas Explosion Belgaumesakal
Updated on
Summary

चहा करण्यासाठी लायटर पेटविताच अचानक आगीचा भडका उडाल्याने पती-पत्नी ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाले.

बेळगाव : सिलिंडर गॅस गळतीमुळे (Cylinder Gas Leakage) आगीचा भडका उडाल्याने आई-वडील आणि दोन मुले जखमी झाली. शनिवार (ता. १) सकाळी सहाच्या सुमारास ओल्ड गांधीनगर येथे ही घटना घडली.

त्यात मंजुनाथ नरसाप्पा अथणी (वय ४०), त्यांची पत्नी लक्ष्मी (३६), मुलगी वैष्णवी (१३), मुलगा साईकुमार (१०, सर्वजण मूळ रा. कोरवीनकोप्प, ता. सौंदत्ती सध्या रा. पहिला क्रॉस सुभाषनगर ओल्ड गांधीनगर) जखमी झाले. सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची नोंद माळमारुती पोलिस ठाण्यात (Belgaum Police) झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंजुनाथ अथणी परिवहन खात्यात चालक आहेत. शुक्रवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपी गेले होते. काल सकाळी मंजुनाथ कामावर जाण्यासाठी लवकर उठले होते.

Cylinder Gas Explosion Belgaum
Kolhapur : दूधगंगा नदी पात्रात आढळल्या 4 मानवी कवट्या; सांगाडा गायब; परिसरात खळबळ

पतीला चहा करून देण्यासाठी लक्ष्मी या देखील उठल्या होत्या. चहा करण्यासाठी लायटर पेटविताच अचानक आगीचा भडका उडाल्याने पती-पत्नी ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन मुलेही जखमी झाली. आगीचा भडका उडाल्याने मोठा आवाज आला.

Cylinder Gas Explosion Belgaum
Instagram वरील मैत्रीतून अल्पवयीन मुलगी दिल्लीतून पोहोचली वेंगुर्लेत; पोलिसांनी जावेदला केली अटक

खिडकींची तावदाने फुटण्यासह घरातील साहित्यानेही पेट घेतला. लागलीच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. माळमारुती पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथणी दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.