फरांडेबाबा यांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व तिथे देववाणी (भाकणूक) केली.
पट्टणकोडोली : विठ्ठल-बिरोबाच्या (Pattan Kodoli Vitthal-Biroba Yatra) नावानं चांगभलंच्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या निनादात, भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस काल प्रारंभ झाला.