निपाणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो अद्याप संपलेला नाही, याची तमा न बाळगता वाढत्या गर्दीतही नागरिक बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. नाकावरचा मास्क हळहळू जागा बदलू लागला आहे. काहीजण मास्क लावतच नाहीत, तर काही जण फक्त तोंडावर ओढतात. काही नागरिक मास्क हनुवटीवर घेऊन बिनधास्त वावरत आहेत. सामाजिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर पिचकाऱ्या मारणारेही भरपूर आढळत आहेत. अशावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बाजारपेठ, बसस्थानक, बससह अगदी गर्दीतही नागरिक नाक-तोंडावर मास्क लावत नाहीत. रस्त्यावर पिचकाऱ्या मारणेही सुरूच आहे. यातून कोरोना विषाणूचा प्रसार व बाधा होऊ शकते, हे अनेक नागरिक विसरून गेल्याचे जाणवत आहे. आता तर दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढणारच आहे. मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आहे. तर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होऊ शकते. दिवाळीच्या गर्दीच्या काळात तरी नागरिकांनी कायद्याच्या धाकाने नव्हे तर मनाने व सर्वांच्या हितासाठी कोरोना प्रसार होऊ नये, यासाठीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
कोरोना बाधेच्या भयानकतेने प्रारंभीच्या काळात नागरिकही मोठी दक्षता घेत होते. पण आता प्रशासनाचे नियम पूर्णपणे पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्यास वेळ लागणार नाही. विना मास्क वाहने सुसाट ऑक्टोबरमध्ये मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकांवर नगरपालिकेसह पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. पण सध्या ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे विना मास्क वाहनधारक सुसाट जाताना दिसत आहेत.
हेही वाचा - काळजी कोरोनाची, फायदा टीबीला! -
"दीपावली सणासह इतर कामानिमित्ताने नागरिकांनी इतरत्र वावरताना सुद्धा कायमस्वरूपी चेहऱ्यावर मास्क वापरणे, प्रवास व इतर सर्व ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारयांनी जारी केले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल."
- महावीर बोरण्णावर, आयुक्त, निपाणी नगरपालिका
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.