Bus Accident : अचानक मागे आलेल्या एसटीच्या धडकेत फार्मसीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत; अपघातात वडिलांचा पाय फ्रॅक्चर

ST Bus Accident : एसटीच्या चुकीमुळे अपघात घडल्याचा आरोप करीत आक्रमक झालेले ग्रामस्थ एसटी आगारावर चाल करून गेले.
ST Bus Accident Bhadgaon Gadhinglaj
ST Bus Accident Bhadgaon Gadhinglajesakal
Updated on
Summary

महाविद्यालयामध्ये बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी संजना व तेथेच लिपिक म्हणून नोकरीला असणारे तिचे वडील आनंद मोटारसायकल (एमएच ०९, ईएन ७५९८) वरून महाविद्यालयाकडे जात होते.

गडहिंग्लज : उतारावर गिअर टाकताना अचानक मागे आलेल्या एसटी बसच्या (ST Bus) धडकेत मोटारसायकलवरील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संजना आनंदा हुदली (२१, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. तिचे वडील आनंदा कलाप्पा हुदली (४७) जखमी झाले. गडहिंग्लज-हलकर्णी मार्गावरील भडगावपैकी बेरडवाडी चढावाच्या वळणावर काल सकाळी दहाच्या सुमारास अपघात (Bus Accident) झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.