तब्बल आठ महिन्यांनी पन्हाळा फुलला ; सुट्टी साधून पर्यटकांची गर्दी

the place of panhala from kolhapur was closed for lockdown but after 8 months tourist place start
the place of panhala from kolhapur was closed for lockdown but after 8 months tourist place start
Updated on

कोल्हापूर (पन्हाळा) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आठ महिने पन्हाळा पर्यटकांसाठी बंद होता. केवळ स्थानिक नागरिक आणि कोर्टकचेरीसाठी येणाऱ्या पक्षकारांशिवाय कोणीही नव्हते; मात्र लाॅकडाउन थोडासा शिथिल झाला. त्यात दिवाळी आली आणि आज रविवारची सुटी गाठून पर्यटक फराळाच्या डब्यासह गडावर आले आणि तब्बल आठ महिने सुनासुना असलेला पन्हाळा पर्यटकांनी आणि वाहनांनी फुलला. गडावर हाउसफुल्ल गर्दी झाली.

गेल्या सात-आठ महिन्यांत कोरोना महामारीमुळे घरातून बाहेर पडता न आल्याने आता पर्यटक येथे मन मोकळे करून लागले आहेत. फराळाचे डबे हलके होताच पाय मोकळे करण्यासाठी तटबंदी वरून फिरू लागले आणि बहरलेल्या निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेऊ लागले.

तरुणाई तर मोकळ्या वातावरणात भलतीच खुलली आणि गाणी गात, थट्टामस्करी करत मोकळ्या वातावरणात लमाण झाली, गडावर जागोजागी भेल, पाणीपुरी, झुणका भाकर, यांच्या गाड्या असल्याने तसेच बच्चे कंपनीसाठी सायकल, चारचाकी गाड्या, रेल्वे, मिनीबस, घोडे असल्याने आलेल्यांना दिवस कधी मावळला हेच कळले नाही. लहानग्यांना पुढच्या आठवड्यात नक्की येऊ, अशी समजूत काढून त्यांना खेळण्यावरून उतरवून घेताना पालकांना कसरत करावी लागत होती.

नाक्‍यावर कर्मचाऱ्यांची दमछाक

थंड गार हवेच्या झुळकामध्येच येतो. बरेचसे रोमहर्षक, तरुणाईला कुरवाळणारे, लहानग्यांना खुणावणारे आणि वयस्करांच मन हलकं करणारं आहे. साहजिकच येथे पर्यटकांच्या गाड्यांची रांग लागली आहे. इतकी की नगरपरिषदेच्या सहा कर्मचाऱ्यांची कर गोळा करताना दमछाक होत आहे. पोलिसांची मदत घ्यावी लागते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.