Kolhapur : ..तरच ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये होईल विवाहाची नोंद; 'या' पंचायतीचा महत्वपूर्ण ठराव

'झाडे लावा, झाडे जगवा' अशा घोषणा फक्त फलकापुरत्याच उरल्या आहेत.'
Nivade Gram Panchayat Kolhapur
Nivade Gram Panchayat Kolhapur esakal
Updated on
Summary

सदरचे छायाचित्र सादर केल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला ग्रामपंचायतकडून मिळणार आहे.

साळवण : गगनबावडा तालुक्यातील निवडे ग्रामपंचायतीने (Nivade Gram Panchayat Kolhapur) नवविवाहित दाम्पत्यांना विवाह नोंदीसाठी (Marriage) आवश्यक कागदपत्रांसोबत आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची दोन झाडे लागवड करून त्यासोबतचे छायाचित्र ग्रामपंचायतीस देणे बंधनकारक केले आहे.

सदरचे छायाचित्र सादर केल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला ग्रामपंचायतकडून मिळणार आहे. निवडे येथे हा निर्णय घेण्यात आला आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा घोषणा फक्त फलकापुरत्याच उरल्या आहेत. मात्र, नववधू-वरांनी आधी वृक्ष लागवड करून त्यासोबतचे छायाचित्र सादर करावे, मगच विवाह नोंद करून प्रमाणपत्र दिले जाईल.

Nivade Gram Panchayat Kolhapur
Kunkeshwar Temple : तुम्ही मंदिरात जात आहात? मग, जरा थांबा! आता मंदिर प्रवेशासाठी असणार 'ड्रेसकोड'

गावातील ज्या व्यक्तीची जमीन कमी असेल किंवा घर मर्यादित असेल अशा ग्रामस्थांनी देखील दोन वृक्ष लागवड करायची आहे. ज्या शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात जमीन असेल असे शेतकरी दोन पेक्षा जास्त वृक्ष लागवड करू शकतात. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच पडिक जमीन लागवडीखाली व अन्य पिकाखाली येऊ शकणार आहे.

Nivade Gram Panchayat Kolhapur
Indian Army : वीर जवान तुझे सलाम, शहीद भोईटेंना अखेरचा निरोप; दीड वर्षाच्या चिमुरडीनं दिला भडाग्नी, कुटुंबीयांचा आक्रोश

महाराष्ट्र शासनाकडून नागरी आणि ग्रामीण क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा उपक्रम माझी वसुंधरा अभियान ४.० व कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. या वेळी सरपंच सरिता दीपक पाटील, उपसरपंच मेघा प्रकाश कांबळे, ग्रामसेवक प्रसाद झोरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.