PN Patil : शरद पवारांना अडचणीत आणणाऱ्या महाडिकांना तेंव्हाच धोक्याची घंटा दिली होती; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

‘२०१९ मध्ये आपल्याच एका कार्यकर्त्यांने काँग्रेस नेत्यावर टीका केली, त्याला माझ्या घराची पायरीही चढू नको, म्हणून सांगितलंय'
PN Patil Dhananjaya Mahadik Sharad Pawar
PN Patil Dhananjaya Mahadik Sharad Pawaresakal
Updated on
Summary

‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रवादीचे उमदेवार धनंजय महाडिक अडचणीत असल्याचे सांगितले होते.

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिलेले उमेदवार (संजय मंडलिक) फुटून जातात, अशी मिश्‍कील टिप्पणी आमदार पी. एन. पाटील यांनी केली, तर पी. एन. पाटील (P. N. Patil) यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवार (धनंजय महाडिक) भाजपमध्ये गेला, असा हसरा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

त्यामुळे सकाळपासून समस्या, प्रश्‍न, आव्हाने मांडणारे कार्यकर्ते सभागृहात खळखळून हसू लागले. ही टोलेबाजी येथेच थांबली नाही, तर कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी फुटून जाणारा उमदेवार देण्याऐवजी न फुटणाऱ्या सतेज पाटील यांनाच लोकसभेची उमदेवारी द्यावी, असे पी. एन. पाटील यांनी, तर माझ्यापेक्षा तुम्हीच लोकसभेसाठी योग्य आहात म्हणनू सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील यांचे नाव सुचवले.

PN Patil Dhananjaya Mahadik Sharad Pawar
NCP Crisis : अजित पवारांसोबत गेलेले लोक दु:खी, आमच्याकडून जे झालं ते चुकीचं झालं असं सांगताहेत; शरद पवारांचा गौप्यस्फोट

त्यामुळे कायकर्त्यांनी दोघांच्या या वक्तव्यावर जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘गेल्या पंचवीस वर्षांत जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभेत जो काँग्रेसचा उमदेवार आहे, त्याच्याच मागे राहिलो आहोत. या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस आघाडीवर राहिली आहे.

अनेकांना पाठिंबा दिला पण तो उमेदवार आपल्यासोबत राहिला नाही. आता जे लोक भ्रष्टाचारी आहेत, लबाड आणि फुटून गेले आहेत. ज्यांनी आमचा विचार केलेला नाही. त्यांना मदत करिअची नाही. लोकसभेसाठी काँग्रेसचा कोणताही उमेदवार द्या त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.’

PN Patil Dhananjaya Mahadik Sharad Pawar
Loksabha Election : कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी! लोकसभेसाठी 'या' दिग्गज नेत्यांना उतरवणार रिंगणात?

दरम्यान, ज्यांच्या मागे सतेज पाटील उभे राहतात तो उमेदवार त्यांच्या उलटा जातो. त्यामुळे काँग्रेसचा न फुटणारा नेता म्हणून सतेज पाटील यांनाही लोकसभेची उमदेवारी द्यावी. त्यांना दिल्लीत मोठी संधी आहे, अशी मिश्‍कील टिपणी पी. एन. पाटील यांनी केली. तर, तुम्हीच या पदासाठी योग्य आहात असे म्हणून सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील यांनाच उमदेवारी जाहीर करा, म्हणून मागणी करता हशा पिकला. यावेळी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

PN Patil Dhananjaya Mahadik Sharad Pawar
NCP Crisis : राजकारणात बेरीज करायची असते, भागाकार-वजाबाकी होऊ नये म्हणून..; 'साहेब-दादा' भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील?

त्या कार्यकर्त्याला पायरी चढू दिली नाही

‘२०१९ मध्ये आपल्याच एका कार्यकर्त्यांने काँग्रेस नेत्यावर टीका केली. त्याला माझ्या घराची पायरीही चढू नको, म्हणून सांगितले आहे. आतापर्यंत सतेज पाटील यांच्यावर टीका करणाऱ्यांना मी आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांना सतेज पाटील सांभाळून घेत होते. आता यापुढे असे चालणार नाही आणि होणार नाही’, असेही पी. एन. पाटील यांनी सांगितले.’

PN Patil Dhananjaya Mahadik Sharad Pawar
पाकिस्तानविरुध्द तुंबळ युद्ध; पाच शहीद, 22 जवान जखमी.. माजी सैनिकानं सांगितला अंगावर काटा येणारा 1965 चा प्रसंग

महाडिकांना धोक्याची घंटा दिली होती...

‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रवादीचे उमदेवार धनंजय महाडिक अडचणीत असल्याचे सांगितले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेच शंभर टक्के उमेदवाराच्या विरोधात काम केले, असेही आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.