Bhogavati Election Results : पी. एन. पाटीलच ठरले भोगावती कारखान्याचे 'किंग'; विरोधकांचा सुपडासाफ, 24 जागांवर एकतर्फी बाजी

राजकारणातील सत्तेच्या सारीपाटाचे ‘किंग’ अखेर आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) हेच ठरले.
PN Patil King of Bhogavati Sugar Factory
PN Patil King of Bhogavati Sugar Factoryesakal
Updated on
Summary

विरोधी कौलवकर आघाडीचे नेते धैर्यशील पाटील आणि विद्यमान उपाध्यक्ष व त्यांचे चुलते उदयसिंह पाटील यांच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत मोठी चुरस झाली.

राशिवडे बुद्रुक : भोगावती साखर कारखान्याच्या (Bhogavati Sugar Factory Election Results) राजकारणातील सत्तेच्या सारीपाटाचे ‘किंग’ अखेर आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) हेच ठरले. काल (सोमवार) झालेल्या मतमोजणीत त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने (Shahu Shetkari Seva Aghadi) २५ पैकी २४ जागा सुमारे अडीच हजारांच्या फरकाने जिंकल्या.

त्यात सत्तारुढ गटातील बहुतांश विद्यमान संचालकांचा समावेश आहे. विरोधी कौलवकर आघाडीचे नेते धैर्यशील पाटील आणि विद्यमान उपाध्यक्ष व त्यांचे चुलते उदयसिंह पाटील यांच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत मोठी चुरस झाली. शेवटचे वृत्त हाती आले होते. तेव्हा धैर्यशील पाटील विजयी झाले होते. यामुळे पी. एन. पाटील यांच्या गटाची ‘गड आला; पण सिंह हरला’ अशी स्थिती झाली.

PN Patil King of Bhogavati Sugar Factory
जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍‍न मिटवा नाही तर..

भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार पी. एन. पाटील यांना शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी साथ केली.

त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीने तसेच माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, भाजपचे हंबीरराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील यांच्या परिवर्तन आघाडीने आव्हान दिले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामध्ये वाढलेला टक्का अखेर पी. एन. पाटील यांच्या बाजूचा कौल देणारा ठरला.

PN Patil King of Bhogavati Sugar Factory
ऊसदराचा दोन दिवसांत निर्णय द्या, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखणार; राजू शेट्टींचा कारखान्यांना कडक इशारा

गेल्या ३५ वर्षांच्या सत्तेमध्ये केवळ एक पंचवार्षिक वगळता सलगपणे आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यावर सत्ता आहे. यावेळीही त्यांचा वट कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पहिल्यापासूनच माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ‘एकला चलो रे’ भूमिका घेतली होती. स्वबळावर आघाडी बनवून नवीन चेहरे घेऊन सभासदांसमोर गेलेल्या पाटील यांनी चांगलीच टक्कर दिली. ते विजयी झाले.

मात्र, त्यांना आपल्या सोबत्यांना विजयी करता आले नाही. तिसऱ्या आघाडीला सभासदांनी नाकारल्याचे दिसून आले. तिसऱ्या आघाडीचे नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील, जनार्दन पाटील यांनाही अपयशाला सामोरे जावे लागले.

PN Patil King of Bhogavati Sugar Factory
Loksabha Election : प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी; माजी मुख्यमंत्र्यांनाच बड्या नेत्यांचा विरोध

या निकालात फक्त विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा पराभव झाला. संस्था गटाच्या शेवटच्या मतमोजणीमध्ये ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान झाले असताना फक्त पाटील यांना वगळल्याचे दिसून आले. याचीच चर्चा मतमोजणी केंद्रावर होती.

आता आश्वासन पूर्तीचे आव्हान

कारखाना आर्थिक अडचणीत असल्याच्या मुद्द्यावरून ही निवडणूक गाजली होती. आता सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला कारखाना कर्जमुक्त करावा लागेल व सभासदांची सवलतीची साखर देण्यासाठी कटिबद्ध व्हावे लागेल.

PN Patil King of Bhogavati Sugar Factory
Satej Patil : आमदार सतेज पाटलांचा सर्वपक्षीय नेते करणार सत्कार; काय आहे कारण, कोण-कोण राहणार उपस्थित?

विजयी उमेदवार असे :

  • कौलव गट : राजाराम शंकर कवडे, धीरज विजयसिंह डोंगळे, धैर्यशील आनंदराव पाटील.

  • राशिवडे गट : मानसिंग विष्णूपंत पाटील, अविनाश तुकाराम पाटील, कृष्णराव शंकरराव पाटील, प्रा. आनंदा धोंडिराम चौगले

  • कसबा तारळे गट : अभिजित आनंदराव पाटील, रवींद्र दत्तात्रय पाटील, दत्तात्रय हणमा पाटील

  • करवीर तालुका - कुरुकली गट : शिवाजी पांडुरंग कारंडे, धोंडिराम ईश्वरा पाटील, केरबा भाऊ पाटील, पांडुरंग शंकर पाटील

  • सडोली खालसा गट : रघुनाथ विठ्ठल जाधव, अक्षय अशोकराव पवार-पाटील, भीमराव अमृता पाटील, प्रा. शिवाजी आनंदराव पाटील

  • हसूर दुमाला गट : प्रा. सुनील आनंदराव खराडे व सरदार चिल्लापा पाटील

  • महिला राखीव - सीमा मारुती जाधव व रंजना दिनकर पाटील

  • अनुसूचित जाती - दौलू कांबळे. इतर मागासवर्ग - हिंदुराव चौगले

  • भटक्या विमुक्त जाती - तानाजी काटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.