Kolhapur Ganeshotsav : एक दिवस तुमचा, पुढील 364 दिवस आमचे असतील; साऊंड सिस्टीमबाबत पोलिस अधीक्षकांचा थेट इशारा

'मर्यादा घालावी; पण लेसर आणि साऊंड सिस्टीम वापरण्यास परवानगी द्यावी'
Kolhapur Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsavesakal
Updated on
Summary

डेसिबलनुसार आवाज असावा, आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीला बाधा पोहोचणार नाही, असे उत्सव साजरे करावेत, यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा.

कोल्हापूर : प्रत्येक वर्षी गणेशोत्सवपूर्व (Ganeshotsav) बैठकीत दणदणाटाची साऊंड सिस्टीम, लेझर लावणार नाही, असे सांगितले जाते आणि पुन्हा लावले जातात. यावेळी असे खपवून घेणार नाही. नियम मोडल्यास शंभर टक्के कारवाई होणारच, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला.

Kolhapur Ganeshotsav
Kolhapur : भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला मोठी संधी; 'या' दोन बड्या नेत्यांनी एकजूट दाखवली तर बदलणार संपूर्ण चित्र

एक दिवस तुमचा पुढील ३६४ दिवस आमचे आहेत, त्यामुळे व्यावसायिकांनी नियम मोडू नयेत, असेही आवाहन त्यांनी केले. आगामी गणेशोत्सवानिमित्त साऊंड सिस्टीम (Sound System), लेझर रे व्यावसायिकांची बैठक अलंकार हॉलमध्ये झाली. सुमारे शंभरावर व्यावसायिक आणि पोलिस अधीकारी उपस्थित होते.

बैठकीत साऊंड सिस्टीम संघटनेचे अध्यक्ष मनीर मुल्ला यांच्यासह व्यावसायिकांनी आम्ही व्यावसायिक आहोत. कर्ज काढून साऊंड सिस्टीम घेतली आहे. त्याचे हप्ते आहेत. मर्यादा घालावी; पण लेसर आणि साऊंड सिस्टीम वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. व्यावसायिक संदीप माने, उदय चव्हाण, संजय नलवडे, अतिष भोसले, व्यंकटेश गालापल्ली, विजय वरुटे, राकेश तिवले, अमित पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Kolhapur Ganeshotsav
25 आमदार राजीनामा देणार अन् लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सरकार कोसळणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

अधीक्षक पंडित यांनी गणेशोत्सव नियमातच झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. ते म्हणाले, "महाद्वार रोडवर जुन्या इमारती आहेत. सिस्टीमच्या आवाजाने त्या कोसळण्याची शक्यता आहे. मिरवणुकीतील वाहनांमध्ये बदल करून सिस्टीम आणि लेझरचे स्ट्रक्चर उभा केले जाते. मंडप, उभा केला जातो. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी घेतली जात नाही.

Kolhapur Ganeshotsav
Uday Samant : 'आम्हाला गद्दार-खोकेबहाद्दर म्हणाले, आता हिम्मत असेल तर अजितदादांवर टीका करून दाखवा'

वाजंत्री कोणते आहेत, त्याची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व परवानग्या घेतल्या की नाही, याची खात्री करा. पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी साऊंड सिस्टीम आणि लेझरमुळे आरोग्य व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली.

Kolhapur Ganeshotsav
Ravikant Tupkar : तेच तेच म्हणणे कितीवेळा मांडू? तुपकरांचा राजू शेट्टींना उद्विग्न सवाल; दहा पानांच्या पत्रातून भूमिका जाहीर

शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आसावरी जाधव यांनीही पर्यावरणाचा -हास कसा होत आहे, हे स्पष्ट केले." इंद्रजित ऐनापुरे यांनी मागणी केली की, सिस्टीम आणि लेझरसाठी ८ बाय १० ऐवजी १२ बाय १२ फुटाला परवागनी द्या.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी ठरलेल्या डेसिबलनुसार आवाज असावा, आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीला बाधा पोहोचणार नाही, असे उत्सव साजरे करावेत, यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी कारवाईबाबत माहिती दिली.

Kolhapur Ganeshotsav
NCP Crisis : राजकीय घडामोडी सुरु असताना अजितदादा शरद पवारांना का भेटले? अखेर कारण आलं समोर; खुद्द दादानीच केला खुलासा

काय आहेत नियम?

  • वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र गरजेचे, ट्रॅक्टर, ट्रॉलीची स्वतंत्र नोंदणी

  • परवाना असलेला चालक आवश्यक; नसेल तर चालक, मालकास प्रत्येकी पाच हजार रुपये दंड

  • कार्यकर्त्यांनी मंडप, मिरवणूक मार्ग, वाजंत्रीची परवानगी घेणे आवश्यक

  • परजिल्ह्यातील सिस्टीम आणू नये, यासाठी नाक्यावर बंदोबस्त

  • एक, आठ, नऊ आणि दहाव्या दिवशी रात्री बारापर्यंत, तर इतर दिवशी रात्री दहापर्यंतच नियमातील साऊंड सिस्टीमला परवानगी

  • मिरवणुकीतील वाहनांसाठी पीयुसी, विमा आवश्यक

  • वाहनांवरील देखाव्याची उंची १५, तर रुंदी ९ फुटांपर्यंतच असावी

आवाज मर्यादा (डेसिबल)

  • औद्योगिक क्षेत्र - दिवसा ७५, रात्री ६५

  • व्यावसायिक क्षेत्र - दिवसा ६५, रात्री ५५

  • रहिवासी क्षेत्र - दिवसा ५५, रात्री ४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.