गोकुळ घडामोडी ; आमदार प्रकाश अबीटकर विरोधी आघाडी सोबत 

 Prakash Abitkar MLA from Radhanagari Assembly constituency Rajarshi Shahu Shetkari Aghadi Gokul elections political marathi news
Prakash Abitkar MLA from Radhanagari Assembly constituency Rajarshi Shahu Shetkari Aghadi Gokul elections political marathi news
Updated on

गारगोटी (कोल्हापूर)  : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश आबिटकर यांनी 'गोकुळ' च्या निवडणूकीसाठी  आज राजर्षी शाहू शेतकरी आघाडीसमवेत (विरोधी आघाडी) राहण्याचा निर्णय जाहीर केला. पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.               

राधानगरी, भुदरगड, आजरा या तीन तालुक्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघ विभागलेला आहे. प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती व आमदार आबिटकर यांचे समर्थक यांची भूमिका वेगवेगळी आहे. या सर्वांना विश्वासात घेत व भविष्यातील राजकीय वाटचाल डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 'गोकुळ' बाबत सावध भूमिका घेतली होती. यामुळे सत्ताधारी व विरोधी आघाडीचे नेते आमदार आबिटकर आपल्याकडे यावेत यासाठी प्रयत्नशील होते. 

आबिटकर यांनी 'गोकुळ' च्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीत सहभागी व्हावे अशी राधानगरी तालुक्यातील त्यांच्यासमवेत असलेल्या नेत्यांनी इच्छा होती. यामुळे आबिटकर यांच्यासमोर सत्ताधारी की विरोधी आघाडीत सहभागी व्हायचे असे धर्मसंकट उभे होते. अखेर शिवसेना, कॉग्रेस-राष्ट्रवादीची राज्यातील महाविकास आघाडी, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक विरोधी आघाडीचे करीत असलेले नेतृत्व  याचा विचार केला आणि  पालकमंत्री सतेज पाटील, खासदार मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीसमवेत राहण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी त्यांनी दीडशे ठराव असल्याचा त्यांनी दावा केला असून दोन जागांसाठी आग्रह धरला आहे. बैठकीस ज्येष्ठ नेते बी. एस. देसाई, मारूतीराव जाधव, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, के. जी. नांदेकर, सभापती कीर्ती देसाई यांच्यासह राधानगरी, भुदरगड मतदारसंघातील प्रमुख नेते उपस्थित होते.    


संपादन- अर्चना बनगे               

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.