जयसिंगपूर हे शिरोळ तालुक्यातील वैद्यकीयदृष्टया अद्ययावत समजले जाते. तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असतात.
जयसिंगपूर : हातकणंगले तालुक्यातील (Hatkanangle) एका गावातील महिलेचा गर्भपातावेळी (Miscarriage) झालेल्या मृत्यूनंतर जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेट (Pregnancy and Abortion Racket) समोर आले आहे. जयसिंगपूर येथे ज्या सेंटरमध्ये गर्भलिंग निदान झाले आहे. त्या सेंटरपर्यत पोलिस तपास पोहचणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. दरम्यान जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या महिलेचा महालिंगपूरम (ता. बागलकोट) येथे गर्भपाताच्या शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यू झाला आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर जयसिंगपूरमध्ये (Jaysingpur) सुरू असलेले गर्भलिंग निदान याचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जयसिंगपूर शहरात गर्भलिंग निदान केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. यासाठी लाखो रूपये उकळले जात आहे.
यापूर्वी गारगोटी, करवीर, शाहूवाडी या ठिकाणी गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचे सर्व म्होरके जेरबंद झाले आहेत. असे असले तरी याचे जाळे कर्नाटकच्या सीमाभागात पोहचले आहे. जयसिंगपूर शहरात दहा तर शिरोळ शहरात चार मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्रे आहेत.
जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या हातकणंगले तालुक्यातील एका गावातील या महिलेने कोणत्या ठिकाणी गर्भलिंग निदान केले आहे याचे मात्र ठिकाण अद्याप समजले नाही. या विवाहितेच्या मृत्यूनंतर जयसिंगपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर हे शिरोळ तालुक्यातील वैद्यकीयदृष्टया अद्ययावत समजले जाते. तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असतात. याचा फायदा घेत शहरातील काहींनी गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचा सपाटा बिनधास्तपणे सुरू ठेवला आहे. गर्भलिंग निदान करण्यासाठी ८० हजार ते १ लाख व गर्भपात करण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये उकळले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.