Draupadi Murmu : राष्‍ट्रपतींचा ताफा तीन तासांपर्यंत असणार कोल्हापुरात; अंबाबाई मंदिर, शासकीय विश्रामगृह परिसरात कडेकोट बंदोबस्त

President Draupadi Murmu visit to Kolhapur : सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत राष्ट्रपती मुर्मू शहरात असणार आहेत.
President Draupadi Murmu visit to Kolhapur
President Draupadi Murmu visit to Kolhapuresakal
Updated on
Summary

सकाळी साडेअकराच्या सुमारास अंबाबाई मंदिरात पोहोचतील. याठिकाणी अर्धातास असणार आहेत. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहावर तासभर विश्रांती घेतील.

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आज कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या ताफ्यामध्ये पन्नासहून अधिक वाहनांचा समावेश आहे. सकाळी अकराच्या सुमारास विमानतळाहून अंबाबाई मंदिराकडे (Ambabai Temple) त्या रवाना होतील. अंबाबाई दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहाकडे जातील. तिथून दुपारी तीनच्या सुमारास तावडे हॉटेलमार्गे महामार्गावरून वारणा कोडोलीतील नियोजित कार्यक्रमासाठी जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.