Sugar Rate : साखरेचे दर 'इतक्या' रुपयांनी गडगडले; कारखानदार हवालदिल, FRP देण्यात येणार अडचणी

साखरेचा प्रतिक्‍विंटल ३६५० रुपये असलेला दर आज ३४५० रुपयांपर्यंत खाली आला.
Sugar Rate FRP Sugar factory
Sugar Rate FRP Sugar factoryesakal
Updated on
Summary

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शासनाकडूनही साखर दरामध्ये फार वाढ न होण्याच्या दृष्‍टिकोनातून खबरदारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापूर : एकीकडे बाजारात साखरेची मागणी कमी आणि त्यात साखरेचे दर (Sugar Rate) प्रतिक्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने कारखानदार (Sugar Factory) हवालदिल झाले आहेत. केंद्र शासनाने जानेवारीसाठी ठरवून दिलेल्या साखर विक्रीचा कोटा अजून तसाच असताना दरातील घसरणीमुळे या हंगामातील एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.

साखरेचा प्रतिक्‍विंटल ३६५० रुपये असलेला दर आज ३४५० रुपयांपर्यंत खाली आला. केंद्राने (Central Government) यावर्षीच्या गाळप हंगामात म्हणजे आक्टेाबर २०२३ ते जानेवारी २०२४ या चार महिन्यांसाठी एकूण ९९ लाख टन साखर कोटा कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दिलेला आहे. गत गाळप हंगामात याच चार महिन्यांसाठी ८९.५ लाख मे. टन कोटा दिला हेाता. म्हणजे जवळ १० टक्के जादा साखरेचा कोटा बाजारात सोडलेला आहे.

Sugar Rate FRP Sugar factory
अंगावर गोळ्या झाडल्या तरी, OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण घेणार; वाघोलीत मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

याचा परिणाम मागणी पुरवठ्याच्या तत्त्‍वानुसार मागणीपेक्षा पुरवठा जादा असेल, तर बाजारातील दरावर त्याचा उलटा परिणाम होऊन मालाचे दर घसरू लागतात. तीच परिस्थिती साखरेच्या दराबाबत आज झालेली आहे. प्रत्येक महिन्यास सर्वसाधारणपणे रेल्वेने कोल्हापुरातील साखर कारखान्यांचे सरासरी ३० ते ३५ रेक साखर इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविली जातात.

Sugar Rate FRP Sugar factory
राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना शरद पवार निवडणुकीत हिसका दाखवणार; रोहिणी खडसेंचा अजितदादा गटावर निशाणा

रेल्वेचा एक रेक ४० वॅगनचा असून, एका वॅगनमध्ये ६५० ते ७०० क्विंटल साखर बसते. म्हणजे एका रेल्वे रेकमधून २६५०० ते २७००० क्विंटल साखर भरून पाठविली जाते. पण, आतापर्यंत केवळ १७ रेकच गेले आहेत. ही परिस्थिती बघता निव्वळ कोल्हापूर जिल्ह्यातून नेहमीपेक्षा इतर राज्यांत जाणारी ५० टक्के साखर या महिन्यात कमी खपलेली आहे. याचा परिणाम कारखान्यांची बॅंकेकडील साखर माल तारण खात्यावर रक्कम उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होऊन उसाची बिले वेळेत आदा करण्यावर होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शासनाकडूनही साखर दरामध्ये फार वाढ न होण्याच्या दृष्‍टिकोनातून खबरदारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा साखरेच्या दरातील घसरण थांबविण्यासाठी साखर संघ व विस्माकडून फेब्रुवारी २०२४ साठी खुला होणारा कोटा कमी करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.

कारण हंगामाच्या सुरुवातीस केलेल्या अंदाजापेक्षा राज्यात साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. शिवाय केंद्र शासनाने इथेनॅालसाठी जाणारी ३५ लाख टन साखर वर्ग केली आहे. त्यामध्ये ५० टक्के कपात करून ती १७ लाख टन इतकीच निश्चित केलेली आहे. शिवाय साखर निर्यातीस बंदी आहे. त्यामुळे देशात साखरेची पुरेशी उपलब्धता हेाणार आहे. इथेनॅाल उत्पादनात कपात झाल्याने मात्र कारखान्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे.

Sugar Rate FRP Sugar factory
Mahabaleshwar : CM शिंदे रमले शेतीत! हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग; शिंदेंना का आहे इतकी शेतीची आवड?

या सर्व स्थितीता विचार करून केंद्राने बाजारातील साखरेचे भाव किफायतशीर पातळीवर राहून कारखान्याना ऊसाची बिले मुदतीत देण्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी फेब्रुवारी २०२४ चा साखरेचा येाग्य असाच कोटा निश्चित करणे जरूरीचे आहे. जादा कोटा दिल्यास साखरेचे दर आणखी घसरतील. परिणामी बॅंका साखर माल तारण कर्जासाठी निश्चित केलेला दर कमी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ऊस बिले देण्यासाठी आणखीन जास्त रक्कमेची कमतरता भासेल. त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसेल.

-पी. जी. मेढे, साखर उद्येाग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.