Maratha Reservation : आरक्षणासाठी दुबईतही मराठ्यांचा एल्गार; मनोज जरांगे-पाटील साधणार Online संवाद

दुबईत छत्रपती मराठा साम्राज्य नावाची संघटना कार्यरत आहे.
Maratha Reservation Dubai
Maratha Reservation Dubaiesakal
Updated on
Summary

मराठा आरक्षणाची लढाई लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी राज्यभर सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दुबईस्थित (Dubai) मराठा समाजाच्या तरुणांनी एल्गार पुकारला आहे. राज्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून २२ डिसेंबरला दुबईत हे तरुण आंदोलन करणार आहेत.

येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते राजीव लिंग्रस सध्या दुबईत दौऱ्यावर आहेत. दुबईत त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेऊन कोल्हापूरसह महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी दुबईतील मराठा तरुणांकडून लिंग्रस यांचा शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

Maratha Reservation Dubai
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटलांच्या 'त्या' भूमिकेला आमचा पाठिंबा; काय म्हणाले काँग्रेस नेते सतेज पाटील?

राज्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून दुबईत २२ डिसेंबरला आंदोलन करणार असल्याची माहिती दुबईस्थित तरुणांनी लिंग्रस यांना दिली. दुबईत छत्रपती मराठा साम्राज्य नावाची संघटना कार्यरत आहे. या संघटनेचे त्या परिसरात सुमारे लाखाहून अधिक सभासद आहेत. त्यात जगभरातील मराठा समाजाच्या तरुणांचा समावेश आहे. त्यापैकी दुबई, शारजाहमधील काही तरुणांची दुबईतील साईधाम या रेस्टॉरंटमध्ये काल बैठक झाली.

Maratha Reservation Dubai
Maratha Reservation Dubai

यावेळी उपस्थित राहून लिंग्रस यांनी चर्चा केली. आरक्षण नाही तर मतदान नाही, या विषयासह मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यावर चर्चा झाली. यात रघुनाथ सगळे, अभिजित देशमुख, संदीप कड, अमोल डुबे-पाटील, विक्रम भोसले, श्रेयस पाटील, मुकुंद पाटील, अनिल थोपटे-पाटील यांचा समावेश होता.

Maratha Reservation Dubai
Assembly Elections : '..तोपर्यंत मी निवडणूक लढणार नाही, हा माझा शब्दच आहे'; BJP आमदाराची मोठी घोषणा

मनोज जरांगे-पाटील साधणार संवाद

दुबईत २२ डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. यात मराठा आरक्षणाची लढाई लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. त्यासंदर्भात लिंग्रस यांन जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली, त्यांनी याला सहमती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.