Republic Day 2022 : जयसिंगपूर : प्रजासत्ताक दिनी (republic day)दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनाचे(parde) नेतृत्व करण्याची जबाबदारी जयसिंगपूरच्या कन्येवर सोपविण्यात आली. असिस्टंट कमांडंट अपूर्वा गौतम होरे(Assistant Commandant Apoorva Gautam Hore) यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची संधी मिळाली आहे. तटरक्षक दलाच्या १६० जणांच्या तुकडीचे त्या नेतृत्व करणार आहेत. दोन महिन्यांपासून त्या सैन्य दलाबरोबर सराव करीत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण येथील जनतारा कल्पवृक्ष विद्या मंदिरमध्ये झाले. पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतले. त्यांचे शिक्षण स्कॉलरशिपवर झाले.
सध्या त्या पोरबंदर (गुजरात) येथे कार्यरत असून तीन वर्षांपूर्वी त्या सेवेत दाखल झाल्या. यूपीएससी परीक्षेत त्या राज्यात पहिल्या आणि देशात सहाव्या आल्या होत्या. नेव्हल अॅकॅडमीमधील ट्रेनिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘अँकर’ने त्यांचा गौरव केला होता. प्रजासत्ताकदिनी तटरक्षक दलाच्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाल्याबद्दल शहरात त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना आई सौ. विनिता होरे, वडील गौतम होरे यांचे प्रोत्साहन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.