Pune Bangalore Highway News
Pune Bangalore Highway News

Pune Bangalore Highway : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था! काँग्रेसचे बडे नेते उतरणार मैदानात; विनाटोल सोडणार वाहने

Congress Leader Protest on Pune Bangalore Highway : रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे
Published on

कोल्हापूर : रस्त्याच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसकडून शनिवारी आंदोलन केले जाणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर आंदोलन केले जाईल. अशी घोषणा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. यावेळी टोल माफ व्हावा, टोल सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. त्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. तर सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराड मधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील.

Pune Bangalore Highway News
Lost Dog Maharaj : पांडुरंगानेच दाखवली वाट... वारीत हरवलेला 'महाराज' २५० किमीचा प्रवास करून परतला घरी; गावाने काढली मिरवणूक

पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन करण्यात आले आहे. यावेळी टोलनाका परिसरात चक्काजाम करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत.

Pune Bangalore Highway News
Beed Crime : दीड महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटून मारहाण! 11 जणांवर जीवघेणा हल्ला; दरोड्याच्या घटनेने हादरला बीड जिल्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.