कोल्हापूर : एखाद्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना मारहाण होते म्हणजेच कायदा हातात घेतला जातो. कायदा हातात घेणारे कुणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमदार सतेज पाटील (Satej Patil) भारतीय जनता पक्षात येणार अशी चर्चा आहे. मात्र, हा शोध कुणी लावला? ते पक्षात येणार की नाही हे माहिती नसल्याचे आज राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सांगितले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Kolhapur) त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. छत्रपती राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना झालेली मारहाण आणि आमदार सतेज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा याबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
विखे-पाटील म्हणाले, ‘महानंद दूध संघाबाबत राजकीय आरोप जास्त सुरू आहेत. मात्र, आंदोलन करण्याऐवजी त्यांनी चालवायला घ्यावा. ‘गोकुळ’ आणि वारणा दूध संघालाही याबाबत विनंती केली होती. मात्र, त्यांनी इच्छा दर्शवली नाही. त्यामुळे ‘एनडीडीबी’ला चालवायला दिला. शिखर संस्थेला हा संघ चालवायला दिला आहे, म्हणजे गुजरातला दिला असे होत नाही. यापूर्वी विदर्भातले दूध संघही चालवायला दिले गेले आहेत.’
‘जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा जनाधार कमी झाला आहे. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्ये करून अशी मंडळी प्रकाशझोतात राहतात. प्रभू रामचंद्रांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विचार करता माफी मागून दुखावलेल्या भावना कमी होणार नाहीत. शरद पवार यांनी आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा’, असेही मंत्री विखे-पाटील म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्यावर नेमकी कोणती कारवाई झाली आहे, याची माहिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘मराठा आरक्षणाबाबतचे सर्वेक्षण सात दिवसांत पूर्ण करायला सांगितले आहे. प्रश्नावली आयोगाने तयार केली आहे. त्यामध्ये महिलांना अपमानित होणारे प्रश्न काढण्याच्या सूचना दिल्या जातील. तीन राज्यांत काँग्रेसचे पानिपत झाले आहे. लोक आता पर्याय शोधत आहेत. राहुल गांधींची यात्रा नवीन नाही. उलट अशा यात्रांमुळे आहे ती मंडळी कॉंग्रेस सोडून जातील. मुंबई महापालिकेची दिवाळखोरी कोणी केली? नालेसफाई गाळात कोणी हातसाफ केले, याचे उत्तर मुंबईकरांना द्यावे लागेल’, असेही विखे-पाटील म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.