Kolhapur : राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे उघडले

Kolhapur : राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे उघडले
Updated on

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) :राधानगरी धरण (Radhanagi Dam) उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून याचे दोन स्वयंचलीत दरवाजे (Automatic Door)खुले झाले आहेत. यातून प्रत्येकी १४२८ प्रमाणे २८५६ क्यूसेक व विज निर्मितीसाठी १४०० असा ४२५६ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.

पावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून त्याची हजेरी आहे. धरणाची दुपारी ३ वाजता पाणी पातळी ३४७.३७ फूट होती. गेट खुले होण्यासाठी अजून ०.१३ ने पाणी पातळी कमी होतीे. एखादा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला की धरण भरले असे समजले जाते. ३४७.५० वर पाणी आले की ही स्थिती येते. हा प्रसंग होण्यासाठी केवळ दोन बोटे पाणी हवे होते. अशा वेळी पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.

Kolhapur : राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे उघडले
पुरावर कायमस्वरूपी उपाय शोधा, संभाजीराजेंची सरकारला विनंती

धरणाची दुपारी ३.५५ ची पाणी पातळी ३४७.४५ फूट गेली. गेट नं ६ व ३ ओपन झाले आहेत. त्यामधून प्रत्येकी १४२८ क्युसेक्स प्रमाणे २८५६ व पाॅवर हाऊसमधून १४०० आसा एकूण ४२५६ क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. आधीच भोगावती नदीला महापूर स्थिर असताना यामुळे स्थिती बिकट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.