Railway Recruitment
Railway Recruitmentesakal

Railway News: आनंदाची बातमी: सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा झाली सुरु!

Published on

Railway News : कोरोना काळात बंद झालेली सह्याद्री एक्स्प्रेस (विशेष रेल्वे) येत्या पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; मात्र ती तूर्त पुण्यापर्यंतच धावणार आहे. मुंबईतील सीएसटी रेल्वेस्थानकावरील तांत्रिक कामे हे त्यामागील कारण आहे. मुंबईतील कामे पूर्ण झाल्यानंतर हीच रेल्वे कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे.

Railway Recruitment
Railway Recruitment : बारावीनंतर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रुप 'क' आणि 'ड'साठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने व संजय मंडलिक यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटनांनी या सेवेसाठी पाठपुरावा केला होता. ‘सकाळ’ नेही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून दररोज रात्री ११.३० ला सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. तेथून त्या रात्री ९.४५ सुटेल आणि कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे सहाला येईल.

कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या सर्वांसाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसनंतर सह्याद्री रेल्वे उपयोगी ठरत होती; मात्र कोरोना काळातही रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी म्हणाले, की हीच रेल्वे मुंबई पर्यंत सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू.

Railway Recruitment
Railway Station Flyover : पुणे रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.