Kolhapur Rain Update : चिंता वाढली! पंचगंगेसह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट; 'राधानगरी'तून विसर्ग पूर्णपणे बंद

पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने घट होत आहे.
Radhanagari dam
Radhanagari damesakal
Updated on
Summary

गेल्यावर्षी आजच्या दिवशी राधानगरी धरणात ४.५० टीएमसी पाणीसाठा होता.

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर (Rain In Kolhapur) ऊन-पावसाचा खेळ सुरु असून उष्माही प्रचंड वाढला आहे. पावसाने ओढ दिल्याने राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) सुरु असलेल्या ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे, पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने घट होत आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी १४ फुटांपर्यंत खाली गेली आहे. तर, जिल्ह्यातील एकही बंधारा सध्या पाण्याखाली नाही. गावागावांत होणाऱ्या पावसाळी जत्रांमध्ये ग्रामदैवताकडे जोरदार पावसाची मागणी आणि नवस केले जात आहेत.

Radhanagari dam
Jain Muni Case : जैन मुनींच्या हत्येबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; सिद्धरामय्या म्हणाले, तपास CBI कडं देण्याची..

जिल्ह्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे धरणातील पाणीसाठा गतीने होत नाही. राधानगरीसह वारणा, दुधगंगा धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी राधानगरी धरणात ४.५० टीएमसी पाणीसाठा होता.

काळम्मावाडी धरणात १२ टीएसमी व वारणा धरणात १८ पाणीसाठा होता. आज मात्र तिपटीने कमी पाणीसाठा कमी आहे. उद्यापासून सोमवारपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Radhanagari dam
Maharashtra Politics Update : मुश्रीफांसारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीनं लढा; 'या' नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत

जिल्ह्यातील धरणांमधील आजचा पाणीसाठा

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ३.४९

  • तुळशी ३.४७ ०.९६

  • वारणा ३४.३९ १४.१७

  • दूधगंगा २५.३९ ४.२०

  • कासारी २.७७ ०.९९

  • कडवी २.५१ १.०३

  • कुंभी २.७१ १.३१

  • पाटगाव ३.७१ १.३९

  • चिकोत्रा १.५२ ०.४५

  • चित्री १.८८ ०.४३

  • जंगमहट्टी १.२२ ०.३५

  • घटप्रभा १.५६ १.५०

  • जांबरे ०.८१ ०.५०

  • आंबेओहोळ १.२४ ०.४०

Radhanagari dam
Mahadev Jankar : 'आता कोणाकडं तिकिटाची भीक मागणार नाही, मी देखील देशाचा पंतप्रधान होणार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.