Kolhapur Rain: कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर! पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur Rain Update Panchganga River: धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने बुधवारी मध्यरात्रीनंतर धोका पातळी ओलांडली. त्यामुळे महापुराचा विळखा पडल्याचे स्पष्ट झाले.
Kolhapur Rain
Kolhapur RaineSakal
Updated on

Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आली. त्यामुळे कोल्हापूर शहरासह परिसर महापुराच्या उंबरठ्यावर आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पातळी 43 फुटांवर गेली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण 99 टक्के भरले. कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने तिकडच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील 90 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिखली आणि आंबेवाडी गावचा अंशत: संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती दलातील तुकडी सज्ज करण्यात आली आहे.



Kolhapur Rain
Kolhapur Rain Update: दुपारनंतर गगनबावड्यात अतिमुसळधार; सलग चौथ्या दिवशी कळे-गगनबावडा मार्ग बंद !

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने बुधवारी मध्यरात्रीनंतर धोका पातळी ओलांडली. त्यामुळे महापुराचा विळखा पडल्याचे स्पष्ट झाले. राधानगरी धरण ९५ टक्के भरले असून, उद्या (ता. २५) संध्याकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, अलमट्टीतून २. २५ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे.

सध्या राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी आणि वारणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून, रात्री १२ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ४२.९ फूट इतकी होती. नदीकाठची गावे आणि शहरातील काही भागांमध्ये पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ४०२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Kolhapur Rain
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, चंदगड आणि करवीर तालुक्यात घरांची पडझड, एस. टी.च्या २७२ फेऱ्या रद्द

यामध्ये महापालिका क्षेत्रातील १०२ नागरिकांचा समावेश आहे. आज वाऱ्याचा वेगही प्रचंड असल्याने शहरातील १४ झाडे पडली. जिल्ह्यातील १० राज्यमार्ग, २७ जिल्हा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत.



महापुरातून....

-राधानगरी तालुक्यातील सर्व धरणांवर अतिवृष्टी कायम

-राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी बंद

-प्रयागचिखलीस बेटांचे स्वरूप

- 'आरोग्य सेवक' परीक्षार्थी चिखलीत पुरात अडकले

-शिनोळी खुर्द येथे अंगणवाडी इमारतीवर झाड कोसळले

-चित्री, उचंगी प्रकल्प तुडुंब

-शाहूवाडी उत्तर भागाला बेटाचे स्वरूप

-नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली मुरगूड निढोरी दरम्यान

पुराचे पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.