पाण्याची चातकासारखी वाट पाहणाऱ्या‍ कर्नाटकला मोठा दिलासा; ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील राजापूर बंधारा 'ओव्हर फ्लो'

ऐन उन्हाळ्यात बंधारा ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, बंधाऱ्या‍वरून पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत चालले आहे.
Rajapur Bandhara Krishna River
Rajapur Bandhara Krishna Riveresakal
Updated on
Summary

गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा जोरदार वळीव झाल्याने शेतीच्या पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पाण्याची बचत झाली व नदीतील पाणीपातळी १६ फुटांवर गेली आहे.

कुरुंदवाड : राजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील (Krishna River) बंधाऱ्या‍चे सर्वच बरगे बसविण्यात आल्याने बंधाऱ्या‍त (Rajapur Bandhara) मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, आज राजापूर बंधारा ‘ओव्हर फ्लो’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऐन उन्हाळ्यात बंधारा ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, बंधाऱ्या‍वरून पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत चालले आहे. त्यामुळे पाण्याची चातकासारखी वाट पाहणाऱ्या‍ कर्नाटकातील गावांना दिलासा मिळाला आहे. तर बंधाऱ्यावरील संरक्षणासाठी असलेल्या पोलिस व पाटबंधारे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला आहे.

खिद्रापूरला आलेल्या पर्यटकांनी (Khidrapur Tourist) बंधारा परिसरात पाण्यात उतरून आनंद घेतला. राजापूर (ता. शिरोळ) हा कृष्णा नदीवरील महाराष्ट्राचा शेवटचा बंधारा असून, शिरोळ तालुक्यासाठी वरदायी आहे. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे शिरोळ तालुक्याची शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागते. कर्नाटकाला त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक वर्षी या बंधाऱ्यातून उन्हाळ्यात सुमारे दोन टीएमसी पाणी देण्यात येते. मात्र, यंदा कमी पावसामुळे पाण्याची टंचाई गृहीत धरून बंधाऱ्या‍चे सर्व बरगे घालण्यात आले आहेत.

Rajapur Bandhara Krishna River
Ganesha Temple : महाराष्ट्र राज्यातील दुसरे 21 फूट जमिनीखाली असलेले अनोखे गणेश मंदिर; काय आहे खासियत?

कर्नाटकात जाणारे पाणी थांबले होते. त्यामुळे पात्र कोरडे पडल्याने कर्नाटक सीमाभागातील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात अज्ञातांनी बरगे काढण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर जलसंपदा खाते जागे झाले व त्यांनी बंधाऱ्या‍वर पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार बंधाऱ्या‍वर पोलिस व जलसंपदा विभागाचा खडा पहारा आहे. दरम्यान, सलग दोन-तीनवेळा जोरदार वळीव बरसल्याने शेतीच्या पाण्याची बचत झाली व नदीतील पाणीही वाढले आहे. बरगे घातल्यानंतर पाणीपातळी १६ फुटांवर गेली असून आज बंधाऱ्या‍वरून पाणी ‘ओव्हर फ्लो’ होऊन कर्नाटकाच्या दिशेने वाहू लागले आहे.

Rajapur Bandhara Krishna River
गुजरातच्या GST आयुक्तांनी कांदाटी खोऱ्यात बळकावली 620 एकर जमीन; महाबळेश्वरातलं 'झाडाणी' का आलं चर्चेत, जमिनीचा काय आहे दर?

एक फुटाने बरगे काढणार

गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा जोरदार वळीव झाल्याने शेतीच्या पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पाण्याची बचत झाली व नदीतील पाणीपातळी १६ फुटांवर गेली आहे. रविवारी बंधाऱ्या‍वरून पाणी ‘ओव्हर फ्लो’ होऊन कर्नाटकाच्या दिशेने वाहू लागले आहे. ४५० क्युसेक्सने पाण्याचा कर्नाटकात विसर्ग होत आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी चार दरवाजांचे बरगे एक फुटाने काढणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता रोहित दानोळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.