शिवचरित्रासाठी शाहू महाराजांनी केला असाही प्रयत्न; उलगडले इतिहासाचे अनेक पैलू..

rajarshi shahu chhatrapati incorrage by shivcharitra historical kolhapur marathi news
rajarshi shahu chhatrapati incorrage by shivcharitra historical kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर :  राजश्री शाहू छत्रपती यांनी जात धर्म यापलीकडे जाऊन अनेक कामे केली आहेत. शाहू महाराजांना दूरदृष्टी होती. याचेच उदाहरण म्हणजे कोल्हापुरी बंधारे, अनेक शिक्षण संस्था, तसेच अनेक जातिधर्मांच्या मुलांसाठी तयार केलेले वसतीगृहे. शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. समाजाच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक  वारसा लाभला असल्यामुळे या राज्यात फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे संबोधले जाते. शाहू महाराजांनी आणखीन एक  महत्त्वाची कामगिरी केली आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन संपूर्ण जगाला समजण्यासाठी शिवचरित्र लिहिण्यासाठीची त्यांची धडपड. त्यांचे हे  योगदान  देखील उल्लेखनीय  आहे.त्याबाबतची माहिती नव्या पिढीला माहीत व्हावी यासाठी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करत अनेकांना शाहू महाराज यांच्या आणखीन एका कर्तूत्वाचे  भांडार खुले करून दिले आहे.

कृष्णाजी केळूसकर गूरुजींनी लिहलेले  शिवचरीत्र  १९२० साली प्रकाशित झाले. या अवृत्तीची  अर्पण पत्रीका त्यांनी राजर्षी शाहू छत्रपतींना अर्पण केली. ही अर्पण पत्रीका इतिहास संशोधक इंद्रजिच सावंत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केली आहे. याचा फायदा इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासाप्रेमी यांना होणार आहे.

https://www.facebook.com/indrajit.sawant.10/posts/6605657369515909

पारसनिसांना दिले  विस हजार रूपये

राजर्षी शाहू महाराजांनी श्री राजा शिवछत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास संशोधन करुन लिहला जावा यासाठी अनेक संशोधकांना प्रेरणा दिली होती. आशा इतिहास अभ्यासकांना  त्यांनी भरघोस आर्थिक मदत दिली होती. संशोधक डि.बी.पारसनिसांना त्यांनी  स्वतः बरोबर इंग्लडला  घेऊन गेले होते. तिथल्या दप्तरखान्यातुन मराठा इतिहासाठी उपयुक्त कागदपत्रांच्या नकला पारसनिसांना सहज मिळाव्यात म्हणून खासा प्रयत्न ही केले होते .पारसनिसांनी हजारो संदर्भ साधने तिथून आणली. या साधनांच्या अधारावर शिवछत्रपतींचा , मराठ्यांचा इतिहास लिहावा म्हणून पारसनिसांना तब्बल विस हजार रुपयांची ( त्यावेळी सोने १३ रुपये तोळा होते. करा गणित !)मदतही दिली होती.पण पारसनिसांनी पैसे घेऊनही मराठ्यांचा ,शिवछत्रपतींचा इतिहास लिहला नाही.

शंभर तोळ्यांनी झाला सत्कार

 राजर्षींची शिवचरीत्र लिहून व्हावे ही इच्छा कृष्णाजी अर्जून केळूसकर यांनी पूर्ण केली. मराठीतील पहिले संपूर्ण शिवचरीत्र कृष्णाजी केळूसकर गूरुजींनी लिहून पूर्ण केले. महर्षी विठ्ठल शिंदे यांनी शिवरायांचे चरीत्र लिहावे म्हणून राजर्षींनी लिहलेले पत्र उपलब्ध आहे.राजर्षींनी आणि महाराजा तुकोजीराव होळकर , राजर्षींचे जामात तुकोजीराव पवार यांनी केळूसकर गूरुजींना भरगोस अर्थिक मदत केली त्यातून केळूसकर गूरुजींनी हे शिवचरीत्र प्रा. ताकाखाव यांच्या कडून इंग्रजी भाषेत भाषांतरीत  करुन घेतले. या भाषांतरा बद्दल केळूसकर गूरुजींनी या प्रा. ताकाखाव यांचा शंभर तोळे सोने देऊन मूंबई मधे सत्कार केला होता. कृष्णाजी केळूसकर गूरुजींनी लिहलेले हे शिवचरीत्र त्यांनी राजर्षी शाहू छत्रपतींना अर्पण केले होते.खरी माहिती शोधून खरा इतिहास जनतेपर्यंत पोहचावा आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी यासाठी झालेला हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहे.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.