‘महात्मा जोतिबा फुले यांचे विचार शाहू महाराज यांनी अभ्यासपूर्वक कृतीत आणले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले.'
कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू महाराजांचे (Rajarshi Shahu Maharaj) विचार दूरदृष्टीचे होते. त्यांनी सक्तीचे शिक्षण, महिलांचे संरक्षण व सन्मान, जातीभेद निर्मूलन, दुर्बलांना आरक्षणाचा (Reservation) लाभ आदी कायदे केले. त्याचेच प्रतिबिंब भारतीय संविधानातही (Indian Constitution) आहे. नव्या काळात भेदभाव, विषमतेचे विचार नव्याने वाढीस लागत आहेत. अशा काळात विवेकी, मानवतावादी विचारांचे कृतिशील आचरण करणे हेच शाहू महाराजांच्या कार्याला वंदन असेल, अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केली.
येथील राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्र्स्ट आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान’ या विषयावर ते बोलत होते. या व्याख्यानमालेची काल सांगता झाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते.
देशमुख म्हणाले, ‘महात्मा जोतिबा फुले यांचे विचार शाहू महाराज यांनी अभ्यासपूर्वक कृतीत आणले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले. तत्कालीन समाजव्यवस्थेत दुर्बल घटकांना शिक्षण मिळते नव्हते, त्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुविधा दिली. आरक्षणाद्वारे बहुजन व दुर्बलांना नोकरीची संधी देण्यासाठी आरक्षणाचा कायदा केला. देशातील पहिल्यांदा आरक्षणाचा कायदा आणला, तोच भारतीय संविधानात समाविष्ट आहे. शाहू महाराजांनी संस्थानात कला, क्रीडा, संस्कृती, संगीत नाटक, चित्रकला अशा अनेक कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले.’ डॉ. पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. अशोक चौसाळकर, राजदीप सुर्वे, जयश्री कांबळे आदी उपस्थित होते.
नव्या काळात अनेक मुले शिक्षण घेतात. मात्र, जेव्हा परगावात उच्च शिक्षणासाठी जावे लागते, तेव्हा केवळ राहणे, जेवणाची सुविधा महाग असल्याने त्यांना शिक्षण घेता येत नाही. शाहू महाराजांचे नाव घेणाऱ्या प्रत्येक आमदाराने मतदारसंघात एक वसतिगृह बांधले, त्यातून गरजू घटकांतील मुला-मुलींना मोफत राहण्याची सुविधा दिली तरी अनेक मुले उच्चशिक्षण घेऊ शकतील. आयुष्यभर त्या आमदारांचे नाव आदराने घेतील. अशा उपक्रमातून शाहू महाराजांचे कार्य यातून चिरंतन राहील, असेही देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.