जिल्ह्यात दहापैकी चार आमदार काँग्रेसचे तर दोन राष्ट्रवादीचे आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले एक तर उर्वरित तीन आमदार अपक्ष आहेत.
कोल्हापूर : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातून नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही पण प्रादेशिक समतोल साधायचा झाल्यास भाजपच्या कोट्यातून जिल्ह्यात मंत्रीपदी कोणाला संधी मिळणार, याविषयी उत्सुकता आहे.
त्यातून डॉ. विनय कोरे की प्रकाश आवाडे यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यावर अचानक गेलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात जिल्ह्याच्या समावेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पक्ष संघटनेची ताकद वाढवणे आणि अनुभव या निकषावरच ही निवड शक्य आहे. त्यात भविष्याच्या राजकारणात ‘आपला कोण’ याला महत्त्व असेल. त्यातून आमदार आबिटकर यांच्या नावावर एकमत होऊ शकते. शिंदे गटात गेल्यापासून कुठलेही वादग्रस्त वक्तव्य नाही, आपला मतदारसंघ आणि आपण भले अशा मानसिकतेत असलेले श्री. आबिटकर हे दुसऱ्यांदा आमदार झाले.
त्यातून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश शक्य आहे. विद्यमान मंत्रिमंडळात कोल्हापूरचा एकही मंत्री नाही, त्याचाही विचार विस्तारात होईल. जिल्ह्यात दहापैकी चार आमदार काँग्रेसचे तर दोन राष्ट्रवादीचे आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले एक तर उर्वरित तीन आमदार अपक्ष आहेत.
भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. तथापि डॉ. कोरे व प्रकाश आवाडे या दोन आमदारांनी निकालानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपला पाठिंबा दिला. भाजपचा विस्तार आणि कार्यकर्त्यांची रखडलेली कामे व्हावीत हा दृष्टिकोन मंत्रिमंडळ विस्तारात असेल.
भाजपच्या अधिक जवळ असलेल्या डॉ. विनय कोरे व प्रकाश आवाडे या दोघांपैकी एकाला मंत्रिपदाची संधी शक्य आहे. दोघेही अनुभवी आहेत, दोघांनाही मंत्री म्हणून कामाचा अनुभव आहे. संस्थात्मक आणि सहकाराच्या पातळीवर दोन्हीही नेते मजबूत आहेत, त्यातून या दोघांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.