जयसिंगपुरात यड्रावकर समर्थक-शिवसैनिकांत राडा, वातावरणात तणाव

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
kolhapur latest update of rajendra patil yadravkar
kolhapur latest update of rajendra patil yadravkar
Updated on

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदांरासह शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानं राज्यातील वातावरण तापलं आहे. जिल्ह्यातील शिवसेनेला पाठिंबा दिलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात जयसिंगपुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. (maharashtra politics) जयसिंगपूर येथे शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमने सामने आले आहेत. यावेळी दोन्ही गटात झटापट झाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (kolhapur latest update of rajendra patil yadravkar)

kolhapur latest update of rajendra patil yadravkar
Maharashtra Politics : बंड आमदारांचा गुवाहाटीतील मुक्काम वाढणार; सूत्रांची माहिती

मागील काही दिवसांपूर्वी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र कोल्हापुरातून ते मातोश्रीला जाण्यासाठी निघाले आणि नंतर परस्पर गुवाहाटीला त्यांचे बंधू एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यड्रावकरही शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज जयसिंगपूर येथे शिवसैनिकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावेळी शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमने सामने आले आहेत.

जयसिंगपूर येथे शिवसैनिक यड्रावकर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसैनिकांना यड्रावकर यांच्या कार्यालयापर्यंत जाऊ न दिल्याने शिवसैनिक आणि पोलिस यांच्यात बाचाबाचीही झाली आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण आणखी चिघळलं आहे. आक्रमक शिवसैनिकांनी पोलिसांचे दोन बॅरिगेट्स तोडून आता घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

kolhapur latest update of rajendra patil yadravkar
'बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या...'; एकनाथ शिंदेंकडून नवा व्हिडीओ ट्वीट

दरम्यान, दुसरीकडे आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर हे आपले बंधू हे शिवसेनेतच राहतील असे सांगत होते. मात्र तेदेखील शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे दोन्ही आमदार आता शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे पक्षाला मोठा दणका बसणार असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()