यावेळी शिवसैनिकांसह तालीम संस्था, मंडळांचे कार्यकर्ते यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांनाच पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला.
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. २०२४ ला दक्षिणोत्तर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी येथे व्यक्त केला.
क्षीरसागर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात झाला. सायंकाळी शनिवार पेठेतील शिवालय येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात केक कापण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, स्नुषा दिशा क्षीरसागर यांच्यासह महिला आघाडीच्या भगिनींनी औक्षण केले.
आतषबाजी, वाद्यांच्या गजरात शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या. ‘संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा भगवा फडकविणार’ अशी गर्जनाच क्षीरसागर यांनी केली. शिवसैनिकांसह तालीम संस्था, मंडळांचे कार्यकर्ते यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांनाच पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला.
दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, युवा सेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, यांच्यासह लोकप्रतिनिधींनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. खासदार संजय मंडलिक यांच्यासह शिवसैनिक, नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.