उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री उद्या कोल्हापुरात; जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आजही गंभीर आहे
उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री उद्या कोल्हापुरात; जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार
Updated on

कोल्हापूर : दोन महिने लॉकडाउन (lockdown in kolhapur) ठेवूनही जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या (corona patients) कमी होत नाही. याची दखल घेऊन जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. (kolhapur tour) त्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक आयोजिली आहे. सोमवारी (ता. १४) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री पवार बैठक घेणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आजही गंभीर आहे. हजार-दीड हजारांपर्यंत रुग्णांची संख्या रोज असून ३० ते ४० व्यक्ती मयत होत आहेत. याबाबत आत्तापर्यंत खुद्द मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री यांनी व्हीसीद्वारे आढावा घेऊन उपाययोजनांबाबत विचारणा केली होती. आता थेट उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपे आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी उपस्थित असणार आहेत.

उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री उद्या कोल्हापुरात; जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार
आम्हीच तुमची वाट पाहतोय; संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.