रास्ता रोको करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महावितरण आणि राज्य सरकारचा निषेध केला
शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ आंदोलन केलं आहे. दरम्यान, या दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. आज याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज वडणगे फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात आज ठिकठिकणी स्वाभिमानीकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान, या चक्काजाम आंदोलनाला कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महावितरणचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, राजू शेट्टी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजू शेट्टी यांचे सुपुत्रही या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि शिरोळ तालुक्यातील उदगाव टोलनाक्याजवळही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून महावितरण व सरकारचा निषेध केला आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
दरम्यान, गेले दहा दिवस सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा भाग आहे. दिवस वीज पुरवठा देण्याची मागणी योग्य आहे मात्र महावितरणमधील माफियांनी एकत्र येत सर्वसामान्य जनता, उद्योजक, शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम केले आहे. ऊर्जामंत्र्यांनी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र तिन पायाचे सरकार अंतिम निर्णय घेईल याची खात्री नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी काल दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.