'कारखानदारांनी मुकाट्याने शेतकऱ्यांना उसाला टनामागे 200 रुपये द्यावेत, नाहीतर..'; ऊस परिषदेपूर्वी शेट्टींचा इशारा

Raju Shetti : तोडणी वाहतूक वाढल्याने एफआरपी वाढूनही शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही.
Former MP Raju Shetti
Former MP Raju Shettiesakal
Updated on
Summary

‘जयसिंगपूर ऊस परिषदेत (Jaysingpur Sugarcane Council) गतवर्षीच्या उसाला २०० रुपये देण्याच्या मागणीसह यंदा अपेक्षित पहिली उचलची घोषणा होणार आहे.'

गडहिंग्लज : ‘कारखानदार काहीही म्हणत असले, तरी गतवर्षीचा हंगाम चांगला गेला आहे. मोलॅसिस, बगॅसच्या दरात वाढ झाली आहे. ब्राझीलमधील दुष्काळामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उंचावतच आहेत. सरासरी ३५५० रुपये क्विंटलने गतवर्षीच्या साखरेची विक्री झाली आहे. त्यामुळे कारखानदारांनी (Sugar Factory) मुकाट्याने शेतकऱ्यांना गतवर्षीच्या उसाला टनामागे २०० रुपये द्यावेत’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथील पत्रकार परिषदेत दिला.

Former MP Raju Shetti
'राज्य चुकीच्या माणसांच्या हातात, महाराष्ट्राला योग्य दिशा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा इशारा

शेट्टी म्हणाले, ‘जयसिंगपूर ऊस परिषदेत (Jaysingpur Sugarcane Council) गतवर्षीच्या उसाला २०० रुपये देण्याच्या मागणीसह यंदा अपेक्षित पहिली उचलची घोषणा होणार आहे. यावर्षी देशांतर्गत गरज भागवून उर्वरित साखर निर्यातीला वाव आहे. त्यातून कारखानदारांना चांगला दर मिळणार आहे. तोडणी वाहतूक वाढल्याने एफआरपी वाढूनही शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. ३००० ते ३३०० रुपयांपर्यंत कारखानदारांनी दर दिला. तेच सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांनी लांबून ऊस आणूनही ३६०० रुपयांवर दर दिला आहे. यामुळे इतर कारखान्यांना आणखीन २०० रुपये देणे अवघड नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘स्वाभिमानीची ऊसदराची मागणी कधीच अवास्तव नसते. या मागणीच्या अनुषंगानेच जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी टनामागे १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. इतर कारखानदारांनीही रक्कम द्यावी. यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. अजूनही महिन्याचा कालावधी आहे. यामुळे हंगामाच्या तोंडावर आंदोलन करीत असल्याच्या आरोपात तथ्य नाही. २५ तारखेला ऊस परिषद असली, तरी तत्पूर्वी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना ऊस दराविषयी चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.’ यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, मल्लिकार्जुन चौडाज, अशोक पाटील, बसवराज मुत्नाळे उपस्थित होते.

Former MP Raju Shetti
Dhananjay Mahadik : 'काँग्रेसच्या काळात साधा चमचाही मिळाला नाही'; असं का म्हणाले भाजप खासदार महाडिक?

पॅकिंग वेगळे, माल एकच...

शेट्टी म्हणाले, ‘महायुती व महाविकास आघाडी म्हणजे पॅकिंग वेगळे; पण माल एकच अशी अवस्था आहे. एखादे गॅंगवॉर चालावे, अशा पद्धतीने आरोपांची पातळी दोन्हीकडून घसरली आहे. यामुळे लोकांना सक्षम पर्याय हवा आहे. म्हणूनच आम्ही परिवर्तन महाशक्तीचा पर्याय दिला असून, प्रत्येक मतदारसंघात आश्‍वासक, व्‍हिजन असलेला व स्वच्छ उमेदवार देण्यावर किंवा अशा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.